चुल्हाड ( सिहोरा ) : येत्या काही दिवसांत सणासुदीचे पर्व सुरू होत आहे. उत्सव साजरे करताना नागरिकांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सिहोरा पोलिसांनी गावात रोड मार्च केले आहे. कोरोना नियमांचे पालन करीत उत्सव शासनाचे निर्देशानुसार साजरे करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी नागरिकांना केले. शुक्रवारी दुपारी रोड मार्च करण्यात आले आहे.
येत्या काही दिवसांत सणासुदीचे पर्व सुरू होत आहे. उत्सव साजरे करताना नागरिकांनी साैहार्द ठेवण्यात यावे. कायदा व सुव्यवस्था राखून उत्सव नागरिकांनी साजरे करण्यासाठी सिहोरा गावांत पोलिसांनी रोड मार्च केले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर नियम लागू करण्यात येत आहेत. या नियमांचे पालन करीत नागरिकांनी उत्सव व सण साजरे करावे, अन्य गावातील नागरिकांना प्रेरित करण्याची गरज आहे. सिहोरा गाव मुख्य व्यापार नगरी असल्याने अनेक गावातील नागरिक या गावात येत आहेत. व्यावसायिकांनी जबाबदारी ओळखली पाहिजे. कोरोना संसर्गाच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करणे चुकीचे आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधी नागरिकांनी कटू अनुभवले आहेत. अनेक कुटुंब आजही सावरले नाहीत. सण व उत्सव साजरे करताना नागरिकांनी गावात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखावी. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी नागरिकांना केले आहे. पोलिसांचे रोड मार्च गावातील राष्ट्रीय महामार्ग, बॅंक ऑफ इंडिया चौक, गुजरी चौक, ग्रामीण सचिवालय, लाल चौक आदी मार्गाने भ्रमण करण्यात आले आहे. या रोड मार्चमध्ये दोन पोलीस अधिकारी, १० पोलीस अंमलदार, २५ सैनिक सहभागी झाले. रोड मार्चचे समापन पोलीस ठाण्यात करण्यात आले.