आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील जागृत हनुमान देवस्थान शेजारी असणाऱ्या घनदाट जंगलातील ऋषीमुनी आश्रमाकडे जाणारा खडीकरण रस्ता वनविभागाने अडविला आहे. या रस्त्यात नाली खोदण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. नर्सरी तयार करण्याचे नावावर वृक्षाची कत्तल वनविभागाने केला असल्याचा आरोप आहे.चांदपुर गावाचे शेजारी भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणारे ऋषीमुनी आश्रम आहे. गुहेत असणाऱ्या या आश्रमात भाविकांची रिघ लागत आहे. जागृत हनुमान देवस्थान आणि ऋषीमुनी आश्रमात ये-जा करण्यासाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. २ किमी अंतरावर असणाºया ऋषीमुनी आश्रमात भाविकांना ये-जा करण्यासाठी खडीकरण रस्ता तयार करण्यात आला आहे. हा रस्ता वनविभागाचे राखीव जागेतून अनेक वर्षापासुन आहे. घनदाट जंगलात ये-जा करण्यासाठी याच रस्त्याचा उपयोग करण्यात येत आहे. याशिवाय भाविक थेट वाहनाने याच रस्त्याने ऋषीमुनीचे आश्रम गाठत आहे. परंतु हा रस्ताच वनविभागाने बंद केला आहे. या रस्त्यावर नाली खोदण्यात आली आहे. यामुळे ऋषीमुनी आश्रमात दर्शनास जाणाºया भाविकांची रहदारी बंद झाली आहे.या रस्त्यावर थेट नर्सरी तयार करण्यात आली आहे. नर्सरी तयार करतांना जंगलात असणाऱ्या झाडांची वनविभागाचे यंत्रणेने कत्तल केल्याचा आरोप होत आहे. असे असले तरी झुडपी कापण्यात आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ऋषीमुनी आश्रमात ये-जा करणारा रस्ता बंद करण्यात आल्याने भाविकांचे रोषाला वनविभागाची यंत्रणा बळी पडत आहे.३ लाखाहून अधिक रोपट्यांची नर्सरी तयार करीत असतांना आधी रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला नाही. यामुळे ऋषीमुनी आश्रमात ये-जा करतांना रस्ता अभावी भाविकांनी कसरत करावी लागत आहे. ऋषीपंचमीनिमित्त आश्रमात यात्रा भरत आहे. या आश्रम शेजारी झरा व वाघाचे गुहा आहेत. दोन टेकड्याचे मध्यंतरी ऋषीमुनी आश्रम श्रध्देचे ठिकाण आहे. भक्त भाविकात या आश्रमाचे विशेष महत्व आहे. या नर्सरी शेजारी वनविभागाचे नाका तयार करण्यात आले आहे. सुसज्ज इमारतीचे बांधकाम झाले आहे. रस्त्याचा मार्ग मोकळा करण्याची मागणी करण्यात आली असून या स्थळाला अर्थ व शिक्षण सभापती धनेंद्र तुरकर, जि.प. सदस्य प्रतिक्षा उमेश कटरे, प्रेरणा उमेश तुरकर, सरपंच मधु अडमाचे, सरपंच उर्मिला हेमराज लांजे यांनी भेट दिली.नर्सरी लागवड करीता रस्ता बंद करण्यात आला असला तरी भाविकांच्या सोईकरीता नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे.- जी. डी. मरस्कोल्हेसहायक क्षेत्रवनपरिक्षेत्राधिकारी बपेरानर्सरी निर्मितीला विरोध नाही. परंतु रस्ता जलद गतीने तयार करायला पाहिजे.- उर्मिला लांजेसरपंच, चांदपुर
तीर्थस्थळाकडे जाणारा रस्ता अडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 11:30 PM
चांदपुर येथील जागृत हनुमान देवस्थान शेजारी असणाऱ्या घनदाट जंगलातील ऋषीमुनी आश्रमाकडे जाणारा खडीकरण रस्ता वनविभागाने अडविला आहे.
ठळक मुद्देरस्त्यावर खोदली नाली : भाविकांमध्ये रोष व्याप्त, चांदपुरातील प्रकार