लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : राज्यात महामार्गाचे जाळे विस्तारत असून खेडोपाडी रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. मात्र याला अपवाद ठरतो आहे तो मोहाडी तालुक्यातील सालई ते नेरला (आंधळगाव) रस्ता. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही गावकऱ्यांना चांल्या रस्त्याची सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांना भर पावसात चिखलातून खडतर प्रवास करावा लागतो आहे.सालई ते नेरला रस्त्याचे आतापर्यत साधे खडीकरणसुध्दा करण्यात आलेले नाही. सालई खुर्द ते नेरला मुख्य रस्त्याची अवस्था चिखलाने माखलेल्या शेतशिवारातील पांदन रस्त्यांपेक्षाही वाईट झाली आहे.प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाºया गावकºयांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासनाने तात्काळ रस्ता दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा ग्रा. प. सदस्य नितीन लिल्हारे यांनी दिला आहे.सालई खुर्द हा रस्ता आंधळगाव ला जोडणारा मुख्य रस्ता असून आंधळगाव शहर असल्याने गावकºयांना प्राथमिक गरजांसाठी आंधळगावला सतत येजा करावी लागते. गावातील अनेकजन कृषि साहित्य, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, आठवडी बाजार, किराणा बाजार, जनरल स्टोअर्स, मेडिकल, शाळेसाठी विद्यार्थ्यी आंधळगावला येत असतात.रस्त्याने जाणाºया नागरिकांना चिखलातून मार्ग काढणे मुश्कीलीचे झाले आहे. सालई खुर्द ते नेरला (आंधळगाव) हा मार्ग दळणवळणासाठी सुलभ नाही, रस्त्यात खड्डे, रस्ता तुटलेला, पावसाळ्यात चिखलाने माखलेला त्यामुळे या रस्त्याचे रहदारी बंद आहे.परिसरातील लोकांना आर्थिक, शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ सालई नेरला रस्त्याचे विषय मार्गी लावावा अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा ग्रा.प. सदस्य नितीन लिल्हारे, ईश्वर दमाहे, मुन्ना अटराहे, नरेश नागपुरे, यशवंत अटराहे, गुलशन अटराहे, ताराचंद लिल्हारे, अनिल ठाकरे, सरसू ठाकरे, बाबूलाल ठाकरे, शिवा पटले, सहसराम अटराहे, शिवदास लिल्हारे, प्रल्हाद निमकर, विलास पटले, लक्ष्मण लिल्हारे, शंकपाल दमाहे व गावकºयांनी केली आहे.
सालई-नेरला रस्ता चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 1:06 AM
राज्यात महामार्गाचे जाळे विस्तारत असून खेडोपाडी रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जात आहे. मात्र याला अपवाद ठरतो आहे तो मोहाडी तालुक्यातील सालई ते नेरला (आंधळगाव) रस्ता. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही गावकऱ्यांना चांल्या रस्त्याची सुविधा मिळत नसल्याने गावकऱ्यांना भर पावसात चिखलातून खडतर प्रवास करावा लागतो आहे.
ठळक मुद्देरुग्णांचा प्रवास बैलबंडीने : सात दशकांपासून ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत