लाेकमत न्यूज नेटवर्कसाकाेली : तालुक्यातील तुकडोजी चौक एकोडी येथे महाराष्ट्र राज्य किसान सभा, महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजूर युनियन, भारतीय महिला फेडरेशनच्या साकोली तालुका शाखेतर्फे दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ व विविध मागण्यांसाठी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे तालुकाध्यक्ष वसंता भुरे, तालुका सचिव किशोर बारस्कर, शेतमजूर युनियनचे तालुकाध्यक्ष दिलीप उंदिरवाडे, सचिव राजू बडोले, भारतीय महिला फेडरेशनच्या देवांगणा सयाम, अपंग संघटनेचे चरणदास सोनवाने यांनी केले. यावेळी भाकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांनी मार्गदर्शन केले. सदर आंदोलन गत २८ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात, तसेच अतिक्रमणधारकांना जमिनीचे व घराचे पट्टे मिळावे, अतिक्रमण धारकांचे धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात यावे, अ, ब, क, ड यादीतील सर्वांना घरकुल देण्यात यावे, सुरु असलेल्या घरकुलाची थकीत किस्त तात्काळ देण्यात यावी, कुटुंब विस्तार अंतर्गत वरच्या मजल्यावर घरकुल देण्यात यावे, वृद्ध, निराधार, विधवा, अपंग यांच्या वर्तमान अर्थसहाय्यात वाढ करून ती तात्काळ किमान दोन हजार रुपये करण्यात यावी, रेशन दुकानातून नियमित रेशन देण्यात यावे, पाच किलो राशन मोफत सुरू ठेवावे, एकोडी येथे धान केंद्र सुरू करावे, शेतीकामाचे हंगाम संपत आले आहे, तेव्हा मागेल त्याला रोजगार हमीचे काम देण्यात यावे व त्यासाठी काम मागणीचे अर्ज नमुना चार पुरवुन रोजगार सेवक किंवा ग्रामपंचायत सचिवाद्वारे ते नियमित स्विकारण्यात येवुन नमुना पाचची पावती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले . कडाक्याच्या थंडीत लाखो शेतकऱ्यांना लहान मुला बाळासह वृद्ध माता पित्यासह आपले आंदोलन असेच सुरू ठेवावे लागले तर साकोली तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीवर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ व विविध मागण्यांना घेऊन पाच जानेवारी ते २४ जानेवारीपर्यंत मोर्चा व ठिय्या आंदोलन करण्यात येईल. २५ जानेवारीला साकोली तहसील कचेरीसमोर पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलर्त्यांनी दिला. रास्ता रोको आंदोलनाची पोलीस विभागाने दखल घेऊन बंदोबस्तावर अधिकारी, कर्मचारी तैनात होते. पण तहसीलदार यांनी आंदोलनाची दखल घेतली नाही. याचा निषेध करुन २८ डिसेंबर रोजी काळी पट्टी लावुन एका शिष्टमंडळाव्दारे त्यांना निवेदन दिले जाईल. आंदोलनात नितीन वासनिक, बाळकृष्ण कापसे, दयाराम लंजे, चैतराम नेवारे, मनोहर बडोले यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
एकोडीत विविध मागण्यांसाठी शेतमजुरांचा रस्ता रोको आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 5:00 AM
आंदोलनाचे नेतृत्व किसान सभेचे तालुकाध्यक्ष वसंता भुरे, तालुका सचिव किशोर बारस्कर, शेतमजूर युनियनचे तालुकाध्यक्ष दिलीप उंदिरवाडे, सचिव राजू बडोले, भारतीय महिला फेडरेशनच्या देवांगणा सयाम, अपंग संघटनेचे चरणदास सोनवाने यांनी केले. यावेळी भाकपचे राज्य सचिवमंडळ सदस्य शिवकुमार गणवीर यांनी मार्गदर्शन केले. सदर आंदोलन गत २८ दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ आणि केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात, तसेच अतिक्रमणधारकांना जमिनीचे व घराचे पट्टे मिळावे, अतिक्रमण धारकांचे धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात यावे,.....
ठळक मुद्देआंदोलनाकडे प्रशासनाची पाठ : तीव्र आंदोलनाचा पदाधिकाऱ्यांचा इशारा