लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील दुर्गा माता मंदीर चप्राड (पहाडी) येथे सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बंदुक व तलवारीचा धाक दाखवून तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. यात दोन लाख रुपये किमतीचे १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. गत काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दुर्गा माता मंदिर चप्राड (पहाडी) हे भंडारा जिल्ह्यात तिर्थस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. माजी खासदार स्व. नामदेवराव दिवटे यांनी या मंदीराची उभारणी केली आहे. या मंदीरात पुजारी म्हणून पंडीत बेनीमाधव मिश्रा व त्यांचे कुटुंबिय वास्तव्यास आहेत. सकाळी सहा ते रात्री आठ वाजतापर्यंत मंदिरात भाविक भक्तांची रेलचेल राहते. रविवारला रात्री ८ वाजताच्या सुमारास मंदीराचे पुजारी व त्यांच्या कुटुंबीयांवर पाळत ठेवून दरोडेखोरांनी मंदीरात प्रवेश केला. यावेळी पुजाºयांचा मुलगा गौतम हा लघुशंकेसाठी बाहेर पडला असता दरोडेखोरांनी गौतमला पकडून त्याचे हात बांधून घेतले व घरी कोण उपस्थित असल्याचे जाणून घेतले.दरोडेखोरांनी बंदूक व तलवारीचा धाक दाखविल्याने गौतमने त्यांना सर्व काही सांगितले. त्यानुसार दरोडेखोरांनी प्रथम गौतम मिश्रा यांच्या वडिलांच्या खोलीत प्रवेश करून त्यांच्या आई मुन्नीबाई मिश्रा यांच्या अंगावरील दागिने व त्यांच्या जवळील रोख वसूल केली. त्यानंतर गौतम मिश्रा यांच्या खोलीत प्रवेश करून पत्नी ज्योती हिच्या अंगावरील दागिने व कपाटातील रोख काढून घेतले. आरडाओरडा केल्यास बाहेर ‘उभे असलेली आमची माणसे तुला मारहाण करतील असे धमकावले. एवढेच नाही तर 'आम्ही मागिल वर्षी पण आलो होतो. पण आम्हच्या हातात काही मिळाले नाही, वषार्तुन आम्ही एकदाच येतो', असे सांगुन रात्री १२ वाजताच्या सुमारास निघून गेले. जातांना मिश्रा कुटुंबियांना आत डांबण्यात आले. दरोडेखोरांनी सर्वांचे मोबाईल हिसकावून घेतले होते. मात्र गौतमच्या मुलीने वडीलांचा मोबाईल लपवून ठेवल्यामुळे सकाळी ही माहीती मंदीर समिती व पोलीस ठाणे लाखांदुरला देण्यात आली.माहिती मिळाल्यानंतर लाखांदूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक के. के गेडाम, पोलीस नायक वैरागडे, चेटूले, तलमले घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण केले. श्वानाने मंदीरा खालील प्रवेशद्वारापर्यत मार्ग काढला. यावेळी पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम, पोलीस नायक भोयर, गोंधळे, बावनकुळे, तलमले, पं.स. उपसभापती शिवाजी देशकर, मंदीर समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर दिवटे, भारत मेहंदळे, सोमेश्वर चौधरी, विनायक हुमणे, विजय खरकाटे उपस्थित होते.
बंदुकीच्या धाकावर दुर्गा देवस्थानात दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 10:19 PM
तालुक्यातील दुर्गा माता मंदीर चप्राड (पहाडी) येथे सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास बंदुक व तलवारीचा धाक दाखवून तीन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा घातला. यात दोन लाख रुपये किमतीचे १५ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. गत काही दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देचप्राड पहाडीची घटना : पुजाऱ्याच्या मुलाला ठेवले बांधून