तालुक्यातील रोहणी गावात जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. गावात जवळपास २५६ कुटुंबांना खाजगी नळ जोडणी देण्यात आली आहे. पाणीपुरवठा योजनेचे जवळपास एक लाख ३० हजार रुपये वीज बिल आहे. पाच दिवसांपूर्वी वीज तोडल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही गावकरी येथील सार्वजनिक बोरवेलचा वापर करीत आहेत तर काही गावकरी कृषी वीज पंपाच्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करीत असल्याची माहिती आहे. गतवर्षी कोरोना संकट निर्माण झाल्याने सर्वत्र लॉकडाऊन होते. या परिस्थितीत ग्रामपंचायतीने काही प्रमाणात वीज बिलाचा भरणा केला. मात्र, वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलाची सक्तीने वसुली व वीजपुरवठा खंडित करणे सुरू केले. या कार्यवाहीपासून बचावासाठी येथील ग्रामपंचायतीने घर कर व पाणी कर वसुली सुरू केली. मात्र, थकीत कराचा व चालू कराचा भरणा करताना नगरिक सकारात्मक प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती आहे.
रोहणर पाणीपुरवठा योजनेची वीज कापली (मथळ्यात ‘रोहणर’.. इन्टोत ‘रोहणा’ आणि खाली बातमीत ‘रोहणी’... नक्की काय ठेवायचे? कृपया पाहून घेणे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 4:32 AM