गत २० वर्षांपूर्वी २००१ - ०३ च्या सुुमारास शासनाच्या रोहयोअंतर्गत स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत मजुरांकरवी तालुक्यातील चप्राड टेकडीवर गिट्टी बोल्डर तोडण्यात आली होती. दरम्यान, टेकडीवर एकूण ११०० घनमीटर गिट्टी बोल्डर तोडण्यात आले होते. त्यात ८० एमएम ची ८०० घनमीटर व ४० एमएमची ३०० घनमीटर गिट्टी बोल्डरचा समावेश आहे. तथापि, सार्वजनिक बांधकाम उपविभागाद्वारे गत २० वर्षांपूर्वी तोडण्यात आलेल्या गिट्टी बोल्डरचे संग्रहण टेकडीवरच करण्यात आले होते.
या गिट्टी बोल्डरचा स्थानिक प्रशासनाद्वारे तालुक्यातील कोणत्याही विकासकामांत वापर न करण्यात आल्याने गत २० वर्षांपासून ही गिट्टी बोल्डर बेवारस स्थितीत पडून आहे. अशा स्थितीत गत काही महिन्यांपूर्वी २० घनमीटर गिट्टी बोल्डर चोरीची घटना उघडकीस आली होती. त्यानुसार स्थानिक सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत गत महिनाभरापूर्वी चप्राड टेकडीवरील तब्बल १४ हजार रुपये किमतीची सात ब्रास गिट्टी बोल्डर चोरी झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार, स्थानिक लाखांदूर पोलिसांनी तब्बल महिनाभरानंतर तपासाअंती अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गोपाल कोसरे करीत आहेत.
150921\img20210805130622.jpg
चप्राड टेकडीवरील चोरी करण्यात आलेली गिट्टी बोल्डर