लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर: शहराला दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येला प्रथम प्राधान्य देऊन तुमसर नगरपरिषदेच्या ४७.७० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्प योजना मंजूर करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी पत्रपरिषदेत दिली.ाडोळे यांनी सांगितले की, पाणीपुरवठा योजनेचा डीपीआर तयार करून शासनाकडे पाठविल्यानंतर २८ मार्चला प्रधान सचिवांच्या दालनात सभेचे आयोजन करण्यात आले. सभेत सकारात्मक चर्चा करण्यात आली.यात महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत२९ मार्चला नगरविकास विभागा मार्फत प्रथम हप्फयाचा निधी २०.२७ कोटी प्रदान करण्यात आलेले आहेत. उर्वरित निधी लवकरच वितरीत करण्यात येईल.उन्हाळ्यात पाणी पुरवठा खंडीत होऊ नये, याकरिता कवलेवाडा (वांगी) बॅरेजमधून १०८ किमी पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. शहरात तीन टँक तयार करण्यात येणार आहे.यात एक शहर वॉर्ड, दुसरी मालवी वॉर्ड व तिसरी गजानन नगरी येथे तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे शहराला ३० लाख लिटर पाणी देता येणार आहे. शहरात दरडोई १३० लिटर पाणी पुरवठा करण्याचा तसेच २ वर्षात प्रकल्प पुर्ण करण्याचा मानस असल्याचेही पडोळे यांनी यावेळी सांगितले. पत्रपरिषदेला पाणीपुरवठा सभापती बालपांडे, माजी सभापती मेहतापसिंग ठाकूर तसेच पालिकेचे कर्मचारीवर्ग उपस्थित होते.पालिका इमारतीकरिता ४.२० कोटी रुपये मंजूरतुमसर नगरपरिषदेची स्थापना दि.२५ मे १८६७ साली झाली. त्यादृष्टीने नगरपरिषदेची इमारत ही फार जुनी असून जीर्णावस्थेत आहे. नगरपरिषद इमारतीचे आधुनिक पद्धतीने कायापालट करणे अतिआवश्यक असल्याची बाब नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांच्या लक्षात आली. नगराध्यक्षांनी नगरपरिषद तुमसर मार्फत शासनाकडे नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाबाबतचा प्रस्ताव तयार करून पाठविला. दुसरीकडे शासनाकडे पाठविण्यात आलेल्या नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम प्रस्तावाला मंजुरी देत त्यासाठी ४.२० कोटी रुपये नगरपरिषद तुमसरला मंजूर केले. बांधकामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहितीही नगराध्यक्ष पडोळे यांनी दिली.
तुमसरसाठी ४७.७० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 10:47 PM
शहराला दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येला प्रथम प्राधान्य देऊन तुमसर नगरपरिषदेच्या ४७.७० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्प योजना मंजूर करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी पत्रपरिषदेत दिली.
ठळक मुद्देपत्रपरिषद : नगराध्यक्ष पडोळे यांची माहिती