लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरापासून १० कि.मी. जवळ असलेल्या गोपीवाडा (शहापूर) येथील बल्याची पहाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य स्थळाच्या विकासाकरिता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ९४ लाख रूपयांचा निधी आमदार डॉ.परिणय फुके यांनी मंजूर करून घेतला आहे.बल्याची पहाडी येथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात परंतु त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा नसल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी पहाडीचा विकास करण्याकरिता आ.डॉ.परिणय फुके यांना निवेदन देवून शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याबाबत मागणी केलेली होती. त्या अनुषंगाने आ.डॉ. फुके यांनी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांची भेट घेवून बल्याची पहाडीच्या विकासाकरिता निधी देण्याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार २०१७-१८ मध्ये प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ९४ लाख रूपयांचा निधी विकासाचा कामाकरिता वितरीत करण्यात आल्याचे आमदार डॉ.परिणय फुके यांनी सांगितले. यामुळे लवकरच कामास सुरुवात होवून पर्यटकांना होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होईल. बल्याची पहाडीकरिता निधी मंजूर करून दिल्याबद्दल ग्रामपंचायत व गावकºयांच्यावतीने डॉ.परिणय फुके यांचे आभार मानले आहे.
गोपीवाडा पहाडीकरिता ९४ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:18 PM
शहरापासून १० कि.मी. जवळ असलेल्या गोपीवाडा (शहापूर) येथील बल्याची पहाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य स्थळाच्या विकासाकरिता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ९४ लाख रूपयांचा निधी आमदार डॉ.परिणय फुके यांनी मंजूर करून घेतला आहे.
ठळक मुद्देफुके यांच्या प्रयत्नांना यश : लवकरच काम सुरू होणार