रहदारीचा मार्ग : अपघातानंतर जागणार प्रशासनइंद्रपाल कटकवार भंडाराशहरातील अत्यंत वर्दळ असलेला मार्ग म्हणजे राजीव गांधी चौक ते मुस्लिम लायब्ररी मार्ग होय. वर्षभरापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते. सद्यस्थितीत हा मार्ग कित्येक वर्षांपासून खड्डेमय आहे, असे बघितल्यावर वाटते.दोन वर्षांत हा रस्ता उखडला असून रस्त्याचे बांधकाम गुणवत्तापुर्वक झाल्याची पोलखोल झाली आहे. गल्लीबोळीचे शहर म्हणजे भंडारा. जेवढे मुख्य रस्ते शहरात नसतील त्यापेक्षा शंभर पटीने जास्त गल्ली-बोळींची संख्या आहे. यातही उल्लेखनीय बहुतांश गल्ल्या या सिमेंट निर्मित आहेत. गतिरोधकांची भरमारही तेवढीच आहे. शहरातील मुख्य मार्गावरील गभणे चौरस्ता ते राजीव गांधी चौक हा मार्ग दोन राज्यमार्गांना जोडणाऱ्या रस्त्यांचा रहदारीचा प्राणवायु आहे. राजीव गांधी चौकातून २४ तास जड वाहतूक असते. येथूनच नागपुरकडे जाणारा बायपास रस्ताही आहे. परिणामी कधीकधी बहुतांश वाहने मौका पाहुन मिस्कीन टँक चौक तर कधी मुस्लिम लायब्ररी चौक मार्गानेही धावतात. परिणामी रस्त्याचे हाल बेहाल झाले आहे. चुरी ठरतेय जीवघेणी या रस्त्याचे जवळपास दोन वर्षांपुर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. तीन वर्ष तरी रस्त्यावर लहानसाही खड्डा निर्माण होणार नाही, असा सज्जड आत्मविश्वास सबंधित बांधकामावरील अभियंत्याने व्यकत केला होता. जीवघेणे असंख्य लहानमोठे खड्डे, त्यातही रस्ताभर पसरलेली चुरी नागरिकांसाठी जीवघेणी ठरत आहे. दुसरीकडे चुरीमुळे धुळीची समस्या निर्माण झाली आहे. या मार्गावर शाळा, शासकीय कार्यालय, सहकारी संस्थांचे कार्यालय, अनेक फुटपाथ दुकाने, बँका, उद्यान आहे.आश्वासन हवेत विरलेरस्त्यावरील जीवघेणे खड्डे आबालवृद्धांच्या जीवावर उठले असताना काही जागृत नागरिकांनी मागील पावसाळ्यात या खडयांमध्ये धान रोवणी आंदोलन करून प्रशासनाला जागे केले होते. त्यावेळी पालिका मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी, या रस्त्यावर तात्काळ भरण घालुन रस्ता बांधकामाबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. खड्यात भरण घालण्यात पण नऊ महिन्यांचा कालावधी लोटला असन रस्त्याच्या बांधकामाबाबत आश्वासनाची पूर्ती झालेली नाही. याकडे बांधकाम विभाग गांभीर्याने लक्ष घालणार काय?
दोन वर्षांत उखडला रस्ता
By admin | Published: March 30, 2017 12:24 AM