राजू बांते।लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावखेड्यात विविध क्रीडा स्पर्धांना सध्या उधाण आले आहे. कबड्डी, कुस्ती आदी खेळांची मांदियाळी खेळाडूंसाठी पर्वणी ठरत आहे. क्रीडा स्पर्धा सफल व नेत्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे. आगामी निवडणुकांवर डोळा ठेऊन या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.गत चार वर्षावर दृष्टीक्षेप घातला तर अशा स्पर्धा गावखेड्यात यापूर्वी झाल्या नाहीत. दिवाळीनंतर कबड्डी, कुस्ती या स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. आता तर अशा स्पर्धांनी अधिक गती मिळवली आहे. अनेक गावखेड्यात होणाऱ्या स्पर्धा या राजकीय प्रेरणेने होत असल्याचे दिसून येत आहे. २०१९ हे वर्ष निवडणुकांचे आहे. निवडणुकीची तालीम व प्रचार स्पर्धा कार्यक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्याचे साधन स्पर्धा आयोजनातून केले जात आहे. राजकारणी नेत्यांनी गावागावात जाणीवपूर्वक गट तर निर्माण करून अनेक गावांच्या एकतेला सुरंग लावला आहे. या फोडा फोडीचा लाभ नेत्यांनी करून घेण्यासाठी अप्रत्यक्षपणे क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची मोट हातात घेतली आहे. मोहाडी तालुक्यात काटी, वडेगाव, पारडी, बेटाळा, रोहणा, सालई अशा कितीतरी गावात कबड्डी, कुस्ती स्पर्धाचे आयोजन केले गेले आहे.देशी खेळांना त्यामुळे चालना देण्याचे कार्य आपसूक होत आहे. तथापि, खेळाडू व स्पर्धा या दोन बाबींशी गावातला पक्ष कार्यकर्ता व त्यांचा नेता, पुढारी यांचे काही देणे घेणे नाही. उद्देश एवढाच, क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या गटाला वेसणासारखा बांधून ठेवणे, त्यांचा उपयोग निवडणुकीस करून घेणे हा एकच विषय नेत्यांना ठावूक आहे. कार्यकर्त्याानी स्पर्धा ठिकाणावर गर्दी करण्याची मेहनत घ्यावी नेत्यांनी राजकीय भाषण ठोकून जावे असेच चित्र सध्या दिसून येत आहे. अनेक खेड्यात हजारो रूपयांचे बक्षीस क्रीडा स्पर्धेत ठेवले जात आहे. या बक्षिसांची रक्कम काही नेत्यांच्या खिशातून, गावाच्या पुढाºयांकडून तसेच अधिकाºयांकडून वसूल केली जात आहे. या क्रीडा स्पर्धा पूर्णपणे कोणत्या पक्ष कार्यकर्त्यांच्या आहेत याची ओळख करणे सहज जाते. आता ही स्पर्धा खेळाची राहिली नसून गावातील स्थानिक पुढारी व कार्यकर्त्यांची झाली आहे. राजकारण्यापलीकडे क्रीडा या विश्वास संचार करणाºया रसिक प्रेक्षकांना विविध स्पर्धा बघण्याची पर्वणी निर्माण करून दिली जात आहे. तसेच खेळाडूंना खेळाची हौस फिटण्याची व रोख बक्षिसे लुटण्याची मांदियाळी ठरली आहे.दुष्काळी परिस्थितीत विविध चषकांचा महापूरतालुक्यात सरपंच चषकापासून ते विविध चषकांचा महापूर आलाय. क्रीडा स्पर्धा घेणे आवश्यक आहे. पण, एकीकडे मोहाडी तालुका दुष्काळग्रस्त आहे. गावपातळीवर मजुरांना काम नाही. काही नियोजन नाही. काही दिवसाने निवडणुकीची आचार संहिता सुरू होईल. दुष्काळ, पाणीटंचाई, रोजगार हे विषय बाजुला राहतील व नागरिकांची गैरसोय होणार आहे.
ग्रामीण भागात क्रीडा स्पर्धांची मांदियाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2019 9:35 PM
कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावखेड्यात विविध क्रीडा स्पर्धांना सध्या उधाण आले आहे. कबड्डी, कुस्ती आदी खेळांची मांदियाळी खेळाडूंसाठी पर्वणी ठरत आहे. क्रीडा स्पर्धा सफल व नेत्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना कसरत करावी लागत आहे. आगामी निवडणुकांवर डोळा ठेऊन या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे.
ठळक मुद्देगटागटांच्या स्पर्धा : आगामी निवडणुकांवर डोळा, बक्षिसांची पर्वणी