यावेळी बीजभाषक म्हणून अहमदाबाद येथील प्रोफेसर डॉ. एम. एच. मकवाना हे मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी डॉ. जगन कराडे तर प्राचार्य डॉ. चेतनकुमार मसराम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. परिषदेच्या दुसऱ्या सत्रात ‘नवीन कामगार व कृषी कायदे : प्रश्न आणि आव्हाने’ या विषयावर डॉ. श्रीनिवास खांदेवाले हे मार्गदर्शन करतील. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. प्रदीप आगलावे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. एन. आर. दीक्षित उपस्थित राहतील. तिसऱ्या सत्रात ‘मराठा व ओबीसी आरक्षण : प्रश्न आणि आव्हाने’ या विषयावर माजी प्राचार्य डॉ. व्ही. एल. येरंडे हे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. नारायण कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. के. आर. झिलपे उपस्थित राहणार आहेत.
एस. एन. मोर महाविद्यालयात आज आभासी राष्ट्रीय परिषद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:38 AM