प्रशासकांचे दुर्लक्ष : आरोग्यावर विपरीत परिणामसाकोली : सांडपाणी वाहून जाणाऱ्या नाल्यामध्ये घनकचरा साचल्याने व नाल्यालगत झाडीझुडपी वाढली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच रविवारच्या आठवडी बाजाराचा कचरा रस्त्यावर पडलेला असतो. यामुळे साकोली येथील लोकांचे आरोग्याला आजाराची भिती बळावली असून नगरपंचायतच्या प्रशासकाची याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप माजी उपसरपंच किशोर पोगळे यांनी केला असून प्रशासनातर्फे तत्काळ नाल्या साफ करून गावातील कचरा साफ करावा, अशी मागणी केली आहे. तालुक्यातील अधिक उत्पन्न मिळविणारी ग्रामपंचायत म्हणून साकोली ग्रामपंचायतीची नोंद आहे. ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये व आत नगर परिषदेत होत आहे. सध्या तहसीलदार यांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. मात्र ज्या दिवशीपासून ग्रामपंचायत संपुष्टात आली त्या दिवशीपासून प्रशासकांनी साकोलीच्या साफ सफाईकडे दुर्लक्ष केले आहे. सर्वत्र कचरा साचला असल्याने घाणच घाण दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)
साकोलीत घाणच घाण
By admin | Published: September 15, 2015 12:37 AM