लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : सिहोरा येथील गजबजलेल्या चौकात असणाºया बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएमची सुरक्षा वाºयावर सोडण्यात आली आहे. यामुळे घाण, केरकचरा तथा थुंकदान म्हणून या एटीएमचा उपयोग नागरिक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.४७ गावांची मुख्य बाजारपेठ असणाºया सिहोरा गावात एकमेव राष्ट्रीयकृत बॅक आॅफ इंडियाची शाखा आहे. तुमसर-बपेरा राज्य मार्गावर बँक आणि एटीएम आहे. बँक आॅफ इंडिया शाखा सिहोराचे हे एटीएम आहे. या एटीएमची सुरक्षा करण्यासाठी आधी सुरक्षा गार्ड होते. यामुळे एटीएमची सुरक्षा, स्वच्छता तथा अशिक्षित एटीएम कार्ड धारकांना या गार्डाचे मार्गदर्शन मिळत होते. कार्डधारकांनी अडचणीचा सामना करण्याची वेळ येत नव्हती. या गार्डाची नियुक्ती ओरिएन्ट कंपनी मार्फत करण्यात आली होती. नक्षलग्रस्त गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्याची सिमा हाकेच्या अंतरावर असल्याने सुरक्षतेचा उपाय म्हणून गाडीची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले होते. दिवसभरासाठी गार्डची नियुक्ती असल्याने नागरिकांना सोईचे ठरत होते. परंतु गत महिनाभरापासून कंपनी मार्फत गार्ड बंद करण्यात आला आहे. एटीएमची सुरक्षा वाºयावर सोडण्यात आली आहे. गार्ड बंद होताच नियंत्रण सुटल्याने एटीएममध्ये थुकंदान असे चित्र निर्माण झाले आहे. केरकचरा तथा घाण यामुळे एटीएम तुंबला आहे. परंतु स्वच्छता करण्यासाठी कुणी पुढाकार घेत नाहीत. 'एक कदम स्वच्छता की ओर' या जागृत वाक्याचे चांगलेच लचके तोडले जात आहे. यामुळे या एटीएममध्ये कुणी जाण्याची इच्छा करित नाही. कधी कधी बँक आॅफ इंडिया शाखेत कार्यरत चपराशी एटीएमची स्वच्छता करित आहे. परंतु रोज रोज करीत नाही. यामुळे गार्डची नियुक्ती पुर्ववत करण्याची गरज आहे.बपेरा, चुल्हाडात एटीएम द्यामध्यप्रदेश राज्याचे सिमेलगत असणाºया बपेरा गावात एटीएमची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी जुनीच आहे. या सुविधा करिता नागरिकांना १३ कि़मी. अंतर गाठावे लागत आहे. या शिवाय चुल्हाड गावात बँक असल्याने एटीएमची सेवा उपलब्ध करण्याची गरज आहे. या गावांना स्मार्ट एटीएम सेवेत आणण्याची मागणी आहे.सिहोरा गावात असणाºया बँक आॅफ इंडिया शाखेचे एटीएम दुर्लक्षित आहे. यात गार्डची गरज असल्याने संबंधितांना पत्रातून मागणी केली आहे.-मधू अडमाचे, सरपंच सिहोरा.
सिहोरातील ‘एटीएम’ची सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 10:07 PM
सिहोरा येथील गजबजलेल्या चौकात असणाºया बँक आॅफ इंडिया शाखेतील एटीएमची सुरक्षा वाºयावर सोडण्यात आली आहे. यामुळे घाण, केरकचरा तथा थुंकदान म्हणून या एटीएमचा उपयोग नागरिक करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ठळक मुद्देघाण आणि कचराच कचरा : मशीनवर पान-खºर्याच्या पिचकाºया, सुरक्षा रक्षकाची नियुक्ती पूर्ववत करण्याची गरज