लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भिलेवाडा येथे आश्विन गोस्वामी यांच्या शेतावर सगुना भात लागवडीविषयी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी मार्गदर्शन केले.गेल्या वर्षी झालेल्या तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट येवू नये तसेच कमी खर्चात, पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीच्या मार्गदर्शनासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. पारंपारिक शेती करताना शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. दरवर्षी उद्भवणाऱ्या पावसाच्या अनियमिततेमुळे वेळेवर रोवणी होत नाही. परिणामी उत्पादनात घट येते. पावसाच्या पाण्यावरील भात लागवडीमुळे एकाच वेळेस रोवणी होत असल्यामुळे मजुरीचे दर वाढतात. लागवडीवर जास्त खर्च येतो. जेवढी जास्त उशिरा रोवणी होते तेवढा रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ व उत्पन्न कमी येते. त्या तुलनेत शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला बगल देत सगुना भात लावणी पद्धतीचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होवून त्यांचे उत्पन्न वाढवून जीवनमान उंचावण्यासाठी सगुना पद्धत फायदेशीर असल्याचे कोटांगले यांनी सांगितले.सगुना भात लागवड पद्धतीने भाताची लागवड जून जुलै महिन्यात रोटावेटरच्या मदतीने जमीन तयार करून १३५ सेमी रुंदीचे व ३० ते ४५ सेमी उंचीचे गादीवाफे तयार करून गादी वाफ्यावर मार्करच्या सहाय्याने २५ बाय २५ सेमीवर मार्क तयार करून २ ते ३ बियाणे मजुरांच्या सहाय्याने पेरणी करावी. या पद्धतीत एकरी ८ किलो बियाणे वापरावे. तणांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उगवणीपूर्व तणनाशकांचा वापर करावा. खताच्या व्यवस्थापनासाठी युरिया ब्रिकेटची १ गोळी एका चौफुलीवर टाकून द्यावी.सगुणा पद्धतीमुळे अगोदरच्या पिकांची मुळे वाफ्यामध्येच ठेवल्यामुळे मुळांची जाळी तयार होते. त्यामुळे पिकांच्या सेंद्रीय कर्जाची गरज मुळे भागवतात. या पद्धतीने भात पिक ८ ते १० दिवस लवकरच तयार होते.मजुरी, लागवड खर्च, बियाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. जमिनीची सुपिकता टिकून राहते. कीड व रोगाचा प्रादूर्भाव कमी होवून उत्पादनात चांगली वाढ होते. ८ ते १० दिवस भात पिक लवकर तयार होते. एकंदरीत सगुना भात पद्धत शेतकºयांसाठी फायद्याची आहे. या पद्धतीत वाढीव उतारा मिळू शकतो. पावसाचा ताण पडला तरी जमीन भेगाळत नाही. पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते. या पद्धतीत भात पिकानंतर पालेभाज्या, हरभरा, गहू, मका, सोयाबीन अशी फेरपालट पिके घेतात.-अविनाश कोटांगले, तालुका कृषी अधिकारी, भंडारा.
‘सगुना’ भात लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 10:02 PM
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भिलेवाडा येथे आश्विन गोस्वामी यांच्या शेतावर सगुना भात लागवडीविषयी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी मार्गदर्शन केले.
ठळक मुद्देअविनाश कोटांगले : कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या भेटीला