बसअभावी शाळेला विलंब : देव्हाडी येथील प्रकारतुमसर : तालुकास्थळापासून अवघ्या पाच किमी अंतरावर असलेल्या देव्हाडी येथील विद्यार्थ्यांच्या शाळेवर बस नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अनेकदा बसच्या प्रतिक्षेत ताटकळत राहावे लागत असल्याने जणू येथे विद्यार्थीनींची जत्राच भरते. बसअभावी विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहचत नसल्याने कधी कधी सुरूवातीचे तास मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान सहन करावा लागत आहे.रेल्वेच्या कलकत्ता मार्गावरील देव्हाडी हे तुमसर तालुक्यातील मोठे जंक्शन आहे. येथून धावणाऱ्या एक्सप्रेस रेल्वेचा हा प्रमुख थांबा असल्याने देव्हाडी येथून रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यासोबतच देव्हाडी येथून तुमसर व अन्य ठिकाणी शिक्षणासोबत अन्य महत्वाच्या कामांसाठी शेकडो विद्यार्थी प्रवास करतात. रेल्वेच्या आवागमनच्या वेळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस येथे पोहचत नाही. त्यामुळे रेल्वे प्रवाशांसह विद्यार्थ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.देव्हाडी येथून तुमसर येथे शिक्षणासाठी रोज शेकडो विद्यार्थी प्रवास करतात. देव्हाडी येथे सकाळी नऊ वाजतानंतर एकही बस येथे येत नाही. रेल्वेचे जंक्शन असल्याने येथे रापमंच्या बसेस धावायला पाहिजे. मात्र, बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थीनी बसच्या प्रतिक्षेत ताटकळत राहतात. यासोबतच रेल्वे प्रवाशांनाही बसची प्रतिक्षा करावी लागते. बसअभावी विद्यार्थी शाळेत उशीरा पोहचत त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत अनेकदा आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले. मात्र, आश्वासना व्यतिरिक्त काहीच मिळाले नाही.नागपूर येथून गोंदियाला जाणारी सायंकाळची ७ वाजताची महाराष्ट्र एक्सप्रेस येते. येथून शेकडो प्रवासी देव्हाडी येथून अन्य गावांकडे जातात. त्यांना पुढील प्रवासासाठी बसची आवश्यकता असताना त्यावेळी बस नसल्याने अनेकांना मिळेल त्या साधनांचा किंवा पायदळ प्रवास करून घर गाठावे लागत आहे. दरम्यान रेल्वेच्या वेळेत बस न येता अनेकदा उशिरा येथे पोहचत असल्याने बसला प्रवाशांखेरीज रिकामे परतावे लागत आहे. (तालुुका प्रतिनिधी)
साहेब... बस वेळेवर सोडा हो...!
By admin | Published: January 04, 2016 12:29 AM