शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शिक्षण विरोधी धोरणांच्या निषेधार्थ धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 10:45 PM

राज्य शासनाने शिक्षक व शिक्षण विरोधी धोरणांचा अवलंब केला आहे.

ठळक मुद्देविदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे नेतृत्त्व : जिल्हा परिषदेसमोर केले आंदोलन, शिक्षणाधिकारी यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने शिक्षक व शिक्षण विरोधी धोरणांचा अवलंब केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले.केंद्रीय कर्मचाºयांप्रमाणे सातवा वेतन आयोग राज्यातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाºयांना लागू करावा, केंद्रीय कर्मचाºयांप्रमाणे महागाई भत्ता १ जानेवारी २०१७ पासून द्यावा, जुनी पेंशन योजना लागू करावी, बीसीपीएस कर्मचाºयांना हिशोबाच्या चिठ्ठया देण्यात याव्या, संच मान्यतेचे काळे जीआर रद्द करावे, अनुदान पात्र शाळांना अनुदान मंजुर करावे, संच मान्यता दुरूस्त करावी, निवृत्तीचे वय ६० वर्षांचे करावे, विना अट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी, आदीवासी शाळेचे शिक्षकांचे समायोजन नजीकच्या शाळेत करावे यासह अन्य मागण्यांचा समावेश होता.राज्य शासनाने शिक्षक व शिक्षण विरोधी धोरणांचा अवलंब केला असून त्याचा या धरणे आंदोलनातून निषेध करण्यात येत असल्याचे विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने यावेळी स्पष्ट केले. जिल्हा परिषद समोर धरणे दिल्यानंतर त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना निवेदन देण्यात आले.धरणे आंदोलनात जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची उपस्थिती होती. आंदोलनात होमराज कापगते, राजेश धुर्वे, श्रीधर खेडीकर, चंद्रशेखर रहांगडाले, के.आर. ठवरे, टी.डी. मारबते, सुरेश जिभकाटे, श्याम गावड, कांता कामथे, अर्चना बावणे, छाया वैद्य, अर्चना भोयर, प्रबोधिनी गोस्वामी, मिना दलाल, देवानंद चेटुले, उमेश पडोळे, मधुकर बोळणे, बी.आर. वंजारी, मनोहर कापगते, अनंत जायभाये, आर.पी. गभणे, मरस्कोल्हे, राहुल मेश्राम, धीरज बांते आदींचा आंदोलनात समावेश होता.