शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
अबू आझमींच्या अडचणी वाढणार?; सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार; प्रकरण काय?
3
"इंपोर्टेड माल", अरविंद सावंत यांनी आक्षेपार्ह शब्द वापल्याचा शायना एनसींचा आरोप, सावंत म्हणाले...
4
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
5
IPL 2025 : स्टार्क, KL राहुल ते मॅक्सवेल! टॉप-१० खेळाडू ज्यांना संघांनी दाखवला बाहेरचा रस्ता
6
"हिरवे कंदिल लावले असते, तर..."; मनसेचा शिवसेना ठाकरे गटाला थेट सवाल
7
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
8
दररोज 6 कोटी रुपयांची फसवणूक, 'डिजिटल अरेस्ट' घोटाळ्यात हराजो लोकांचे नुकसान
9
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
10
Aishwarya Rai Birthday: इन्स्टावर १४.४ मिलियन फॉलोवर्स, पण 'त्या' एका व्यक्तीलाच फॉलो करते मिस वर्ल्ड, कोण आहे ती?
11
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
12
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
13
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
14
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
15
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
16
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
17
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
18
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
19
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
20
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."

साकोली आघाडीवर; गोंदिया पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 10:10 PM

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या पोटनिवडणुकीत ९ लाख ३४ हजार २२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची अंतिम टक्केवारी ५३.१५ ईतकी आहे.

ठळक मुद्दे५३.१८ टक्के मतदान : ‘स्ट्राँग रूम’ परिसराला छावणीचे स्वरूप, ३१ मे रोजी होणार मतमोजणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या पोटनिवडणुकीत ९ लाख ३४ हजार २२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची अंतिम टक्केवारी ५३.१५ ईतकी आहे.या पोटनिवडणुकीत साकोली विधानसभा क्षेत्रात ६०.३३ टक्के सर्वाधिक तर गोंदिया विधानसभा क्षेत्रात ४४.८७ टक्के सर्वात कमी मतदान झाले. आता सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे ती ३१ मे च्या मतमोजणी दिवसाची. गुरूवारला दुपारपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे.भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात १७ लाख ५७ हजार ८५४ मतदार असून यामध्ये ८ लाख ८२ हजार १७५ पुरूष तर ८ लाख ७५ हजार ६७९ महिला मतदार आहे. यापैकी ४ लाख ७७ हजार ३७० पुरूष तर ४ लाख ५६ हजार ८५९ महिला असे एकूण ९ लाख ३४ हजार २२९ मतदारांनी मतदान केले.तुमसर विधानसभा क्षेत्रात १ लाख ६७,०९० (५७.३८ टक्के), भंडारा विधानसभा क्षेत्रात १ लाख ६५,१३३ (४५.९० टक्के), साकोली विधानसभा क्षेत्रात १ लाख ८६,३११ (६०.३३ टक्के), अर्जुनी विधानसभा क्षेत्रात १ लाख ४२,४०७ (५७.९४ टक्के), तिरोडा विधानसभा क्षेत्रात १ लाख ३५,४७९ (५५.२७ टक्के), गोंदिया विधानसभा क्षेत्रात १ लाख ३७,८०९ (४४.८७ टक्के) मतदान झाले.यापैकी साकोली क्षेत्रात ६०.३३ टक्के इतके सर्वाधिक तर गोंदिया क्षेत्रात ४४.८७ टक्के कमी मतदान झाले. या पोटनिवडणुकीत महिलांपेक्षा पुरूषांच्या मतदानाची टक्केवारी अधिक होती. पुरूषांच्या मतदानाची टक्केवारी ५४.११ इतकी तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ५२.१७ ईतकी आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून ३१ मे रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात मतमोजणी होणार असून ईव्हीएम ‘स्ट्राँग रूम’मध्ये ठेवण्यात आले आहे. या परिसरात शस्त्रधारी पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून मुख्य मार्गावर पोलिसांसाठी राहुटी तयार करण्यात आली आहे. या ‘स्ट्राँग रूम’ समोरचा मार्ग रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.४९ मतदान केंद्रांवर होणार आज फेरमतदानसोमवारला पार पडलेल्या या पोटनिवडणुकीत ईव्हीएमच्या तांत्रिक बिघाडामुळे ४९ मतदान केंद्रांवर मतदान झाले नव्हते. त्यामुळे या ४९ केंद्रावर (दि.३० मे) बुधवारला फेरमतदान होणार आहे. यात भंडारा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र अडयाळ (३०२), नवेगाव (३२०), उमरी (३१८), पिंपळगाव (३३५), पवनी (४०३), पवनी (४०५), खैरी दिवाण (३७४), पिलांद्री (३१४), केसलवाडा (३१७), पाथरी पुर्नवसन (३२२), लोणारा (३६२), लोणारा (३६३), वलनी (४२८), वलनी (४२९) अशा १४ केंद्रांवर, साकोली विधानसभा क्षेत्रातील पारडी (३०६), मुरमाडी (३१६), तईबुज (२९२), घोडेझरी (२८७) अशा चार केंद्रांचा समावेश आहे.