लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया कपंनीच्या नावाने असलेली संपत्ती विक्री करुन ठेवीदारांची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाला केली असता शासनाचे ओदश प्राप्त झाले असून तात्काळ कार्यवाही करुन ठेवीदाराची रक्कम परत करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे, असे आश्वासन जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्यामुळे आंदोलनाला यश मिळाले असून ठेविदारांमध्ये आनंद व्याप्त आहे.जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. व जयविनायक बिल्डकार्प या कंपनीच्या संचालकांनी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातील लोकांना तीन वर्षात, चार वर्षात रक्कम दुप्पट करुन देण्याचे आर्थिक प्रलोभन देवून २५ हजार कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. ठेवीदारांची मुदत पूर्ण होऊन रक्कम परत मिळत नसल्याचे लक्षात आल्याने पूर्व विदर्भातील जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लि. कंपनीच्या ठेवीदारांनी सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे यांच्या नेतृत्वात लोकशाही पध्दतीने आंदोलन सुरु केले.भंडारा येथे संचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात पाच संचालकांना अटक करण्यात आली. त्यातील दोन संचालक आजही कारागृहात आहेत. परंतु ठेवीदाराची रक्कम मिळत नसल्याने कंपनीच्या संचालकाच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करण्यात यावी व ठेवीदाराची रक्कम परत करण्यात यावी म्हणून नागपूर हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. त्याची दखल शासनाने घेतली असून कपंनीच्या संचालकांच्या नावाने असलेली भंडारा, गोंदिया, ब्रम्हपुरी, बोटे येथील मालमत्ता जप्त केली आहे. या सर्व मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. असे आदेश उपसचिव गृहविभाग यांनी दिले आहे. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना ठेवीदारांची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी विष्णुदास लोणारे, कन्हैया नागपुरे, वंदना ठाकरे, मधुकर येरपुडे, अश्विन बेलेकर, ज्ञानेश्वर गजभिये, सुरज कुथे, ज्ञानेश्वर निकुरे उपस्थित होते.
‘जेएसव्ही’ संचालकांच्या मालमत्तेची विक्री होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 1:05 AM
जे.एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया कपंनीच्या नावाने असलेली संपत्ती विक्री करुन ठेवीदारांची रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रशासनाला केली असता शासनाचे ओदश प्राप्त झाले असून....
ठळक मुद्देठेवीदारांमध्ये आनंद : आंदोलनाला यश