मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज कारखाना मागील बारा वर्षापासून बंद आहे. अभय योजनेत कारखान्याला वीज बील माफ करून तीन वर्षात कारखाना पूर्ववत सुरु करण्याची अट त्यात होती. कारखानदाराने कारखाना मागील चार वर्षात सुरु न करता कारखाना परिसरातील कोट्यवधींची मॅग्नीज परप्रांतात विक्री केल्याची धक्कादायक माहिती आहे. दररोज येथून २५ ते ३० ट्रक मॅग्नीज परप्रांतात जाणे सुरुच आहे.तुमसरजवळ माडगी येथे युनिव्हर्सल फेरो अलाईड केमिकल्स नावाचे मॅग्नीज शुध्द करणारा कारखाना आहे. सुमारे साडेचार दशकापूर्वी हा कारखाना मुंबई येथील उद्योगपतीने सुरु केला होता. गत बारा वर्षापूर्वी कारखान्याची वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. पूर्वी येथे एनटीपीसी सवलतीचा दरात वीजपूवरठा करीत होती. सुमारे १२०० कामगार यामुळे येथे बेरोजगार झाले.सन २००६ मध्ये राज्य शासनाने आजारी कारखान्याचे वीज बील काही अटीवर माफ करण्याचे धोरण आखले होते. अभय योजनेत सदर कारखान्याचे वीज बील येथे अंशत: माफ करण्यात आले, परंतु कारखाना तीन वर्षात सुरु न करण्याची अट शासनाने घातली होती. गत तीन वर्षात हा कारखाना सुरु झाला नाही. उलट कारखानदाराने कारखाना परिसरातील कोट्यवधीची मॅग्नीज छत्तीसगढ राज्यात विक्री केल्याची माहिती आहे. दरदिवशी येथून २५ ते ३० ट्रक मॅग्नीजची वाहतूक होत आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेटचार दिवसांपूर्वी शिवसेनेचे तुमसर विधानसभा प्रमुख शेखर कोतपल्लीवार बेरोजगारकृती समितीचे संयोजक अमित मेश्राम तथा इतर शिवसैनिकांनी कारखाना परिसरात भेट दिली. त्यांनी सुरक्षा रक्षकांनी रोखले. तुम्हाला परवानगीशिवाय आत जाता येणार नाही, असे सांगितले. मॅग्नीज भरुन ट्रक कुठे जात आहेत. असा प्रतिप्रश्न केल्यावर नकारार्थी उत्तर देण्यात आले. ट्रक चालकांना विचारल्यावर त्यांनी छत्तीसगड राज्यात जात असल्याची माहिती दिली. येथे गोरखधंदा सुरु असल्याचा आरोप कोतपल्लीवार यांनी लावला. असल्याचे कोतपल्लीवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.कारखाना बंद असतांना परप्रांतात ट्रकने मॅग्नीज मागील चार वर्षापासून नेली जात आहे. कराराचा भंग करणाºया कारखान्यावर नियमानुसार कारवाई राज्य शासनाने करावी. याप्रकरणी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटून माहिती देणार आहे.- शेखर कोतपल्लीवारशिवसेना प्रमुख, तुमसर विधानसभा क्षेत्र
भंडारा जिल्ह्यातून कोट्यवधींच्या मॅग्नीजची परप्रांतात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 3:31 PM
तुमसरजवळील युनिव्हर्सल फेरो मॅग्नीज कारखाना परिसरातील कोट्यवधींची मॅग्नीज परप्रांतात विक्री केल्याची धक्कादायक माहिती आहे.
ठळक मुद्देशासन कराराचा भंग वीज बील माफीचे भिजत घोंगडे