लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : युवा रूरल असोसिएशनच्या वतीने सालेबर्डी येथे ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष टोमदेव तितीरमारे व पोलीस पाटील हिरालाल पुडके यांनी केले. यावेळी युवा रूरल असोसिएशनच्या मार्गदर्शक सुषमा बन्सोड यांनी अत्याचार व मुलींना शिक्षणाच्या नव्या संधी कशा निर्माण करता येतील, मुलीसाठी वेगवेगळ्या योजनांची माहीती दिली.प्रमोद येलजवार यांनी मुलींना नर्सिग ट्रेनिंगबद्दल माहिती दिली. ग्रामीण भागात होणाºया समस्या यांचे निवारण कसे करायचे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शशांक विद्यालयाचे मुख्याध्याक किरणापुरे उपस्थित होते. मनोज बोरकर, सुषमा बन्सोड, महाराष्ट्र युवा परिषद उपाध्यक्ष आकाश रामटेके, प्रज्वल रंगारी उपस्थित होते.
सालेबर्डीत ‘बेटी बचाव बेटी पढाओ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 11:40 PM
युवा रूरल असोसिएशनच्या वतीने सालेबर्डी येथे ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
ठळक मुद्दे‘बेटी बचाव बेटी पढाओ’