शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

भंडाऱ्यात खासदारांसाठी रात्री दहा वाजता उघडले सलून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 7:09 PM

खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी बैठक घेवून या जनता कफ्यूर्साठी नागरिकांना आवाहन केले होते. मात्र त्यांनीच नियम मोडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देनगरपरिषदेने ठोठावला दुकानदाराला दंडव्हिडिओ व्हायरल

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसगार्चा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शहरात घोषित जनता कर्फ्युच्या आदल्या रात्री दहा वाजता खासदार तथा नगराध्यक्षांसाठी सलून उघडून त्यांची दाढी-कटिंग केल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याप्रकरणी नगरपरिषदेने सदर सलून व्यवसायिकाला पाच हजार रुपए दंड ठोठाविला आहे. जनता कर्फ्यूची घोषणा करणाऱ्यांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

भंडारा शहरात अलिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याला प्रतिबंध घालण्यासाठी नगरपरिषदेच्या पुढाकाराने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस जनता कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. खासदार तथा नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी बैठक घेवून या जनता कफ्यूर्साठी नागरिकांना आवाहन केले होते. मात्र त्यांनीच नियम मोडल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जनता कर्फ्यूच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री १० वाजता ते येथील जिल्हा परिषद मार्गावरील साई मंदिर परिसरातील एका सलूनमध्ये दाढी-कटिंग करीत असल्याचा तो व्हीडीओ आहे. शनिवारी सकाळपासून हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून खासदार तथा नगराध्यक्ष नियम मोडत असेल तर काय, असा प्रश्न सोशल मीडियातून विचारला जात आहे.

दरम्यान या प्रकरणाची माहिती नगरपरिषदेतील कोविड नियंत्रण कक्षाला कुणीतरी दूरध्वनीवरून दिली. त्यावरून तात्काळ नगरपरिषदेचे पथक या सलूनमध्ये पोहचले. त्याठिकाणी पंचनामा करून कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच सदर सलून व्यवसायिकाला पाच हजार रूपयाचा दंडही ठोठावला. दरम्यान याप्रकरणी पोलीसात तक्रार दिली काय, याबाबत ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांना विचारणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी आपणाकडे अर्ज आला होता परंतु अशा प्रकरणात कारवाईचे अधिकार नगरपरिषदेला असल्याने त्यांना तेथे जाण्यास सांगण्यात आल्याचे बन्सोडे म्हणाले.कोरोना रुग्ण आढळल्याने आम्ही राहतो तो परिसर कंटेन्मेंट झोन घोषित झाला आहे. तसेच दोन दिवस शहरात जनता कर्फ्यू असल्याने रात्री नागपूरला जात होते. रस्त्यावर सलून उघडे दिसल्याने वॉशरूमसाठी तेथे गेलो. त्यावेळी त्याला एवढ्या रात्री दुकान उघडे कसे असे विचारले तेव्हा एसीची दुरूस्ती करीत असल्याचे दुकानदाराने सांगितले. आपण त्याला चेहऱ्यावर पाणी मारून फ्रेश करून दे असे म्हटले. त्याचवेळी कुणीतरी व्हीडीओ तयार केला असावा. हा प्रकार मला बदनाम करण्याचा आहे.सुनील मेंढे, खासदार तथा नगराध्यक्ष भंडारा.व्हायरल व्हिडीओची माहिती आम्हाला मिळाली. तसेच नगरपरिषदेच्या कोविड नियंत्रण कक्षातही दुरध्वनीवरून सूचना दिली. त्यावरून आमचे पथक त्या ठिकाणी पोहचले. दुकानदाराला पाच हजार रुपए दंड केला. पुन्हा हाच प्रकार घडल्यास दुकान कायमचे बंद करण्याची ताकिद दिली. शहरात नियमाचा भंग करणाºया कुणाचीही गय केली जाणार नाही. लवकरच शहरात रात्र गस्तीसाठी एक पथक तयार करण्यात येणार आहे.विनोद जाधव, मुख्याधिकारी, नगरपरिषद भंडारा.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी