लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील हजारो हेक्टर शेतातील धानपीक तुडतुडा, करपासह विविध प्रकारच्या कीडींच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने येथील शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. धानपिकाची नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी प्रहार जनशक्ती संघटना तथा अपंग क्रांती आंदोलनच्या वतीने तहसीलदार लाखनी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.खरिप हंगामातील धान उत्पादक शेतकºयांचे शेवटच्या टप्प्यात धान कापणिच्या वेळेस तुडतुडा, करपासह विविध किडींच्या प्रादुर्भावामुळे शेतातील धानपिक हिरावल्या गेले आहे.त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत येवून सेवा सहकारी खासगी बँक व सावकारी कर्ज कसे फेडावे त्याच बरोबर कुटुंबाचे उदरनिर्वाह अन्य आवश्यक गरजांची पूर्तता करण्यास त्यांचे समोर समस्यांचे डोंगर उभे झाले आहे.त्याच बरोबर धान शेती करतांना रोपनी व रोवणी कालावधीत कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी ेयांकडून शेती विषय योग्य मार्गदर्शन व रोग प्रतिकार उपायाकरिता प्रत्यक्ष कार्यवाहीला महत्व न देता कागदोपत्री प्रक्रीया चालविल्यामुळे ऐन धानपिक काढताना विविध, रोगांची व किडींचा पिकावर परिणाम जाणवत असल्याची ओरड आहे.शेतात सिंचनाची व्यवस्था असून मात्र विद्युत विभागाच्या भारनियमनामुळे पिकाला आवश्यक गरजेच्यावेळी शेतीला व पिकाला पाणीपुरवठा करता येत नाही. अशा विविध समस्यांमुळे येथील शेतकरी संपूर्ण हवालदिल झाले आहे.त्यामुळे किडींच्या प्रादुर्भावामुळे धान पिकाची झालेली नुकसान भरभाई तात्काळ मंजूर करावी, धान उत्पादन इंग्रजकालीन आनेवारी पध्दती संपुष्टात आणून, नव्याने सुधारीत फेर आनेवारीची अंमलबजावणी करावी, कृषी पंपाचे थ्रिफेस वीज पुरवठा २४ तासासाठी करावे, तलाठयामार्फत बंद करण्यात आलेली ३६ प्रकारची दाखले व दस्ताऐवज पूर्ववत सुरू करावे, तहसील व पंचायत समिती कार्यालयात रॅम्पची व्यवस्था करणे आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार लाखनी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना प्रहार जनशक्ती संघटना तथा अंपग क्रांती आंदोलन द्वारे देण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश पाखमोडे, रवि मने, लाखनी तालुकाध्यक्ष डी.पी. बडोले, सुनिल कहालकर, किरण मेंढे, प्रेमचंद निर्वाण, प्रमोद हनवतकर, सुखदेव तवाडे, रमेश गायधनी, महेश घनमारे, मनोहर मेश्राम, मंगेश गेडाम, पंकज मेश्राम आदी उपस्थित होते.
धानपिकाची झालेली नुकसानभरपाई तत्काळ मंजूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:19 PM
तालुक्यातील हजारो हेक्टर शेतातील धानपीक तुडतुडा, करपासह विविध प्रकारच्या कीडींच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाले आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : प्रहार जनशक्ती संघटना, अपंग क्रांती संघटनेचा आंदोलनाचा इशारा