शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

रेती साठ्याचा लिलाव; महसूल प्रशासनाला चपराक

By admin | Published: November 23, 2015 12:36 AM

तुमसर तालुक्यातील आष्टी व पांजरा (रेंगेपार) येथील नदीकाठावर १,२२८ ब्रास अवैध रेती साठ्याचा महसूल प्रशासनाने लिलाव केला.

महाराष्ट्राची रेती मध्य प्रदेशात : आष्टीत १२ हजार तर पांजऱ्यात नऊ हजाराची वाढ, प्रसिद्धी न देता जाहीरनामा काढून लिलावमोहन भोयर तुमसर तुमसर तालुक्यातील आष्टी व पांजरा (रेंगेपार) येथील नदीकाठावर १,२२८ ब्रास अवैध रेती साठ्याचा महसूल प्रशासनाने लिलाव केला. महसूल प्रशासनाने निर्धारित केलेल्या किमतीत केवळ १२ व ९ हजार रुपयांची वाढ झाली. १८ कंत्राटदार लिलावात सहभागी झाले होते. येथे कंत्राटदारांनी आपसात संगनमत करून महसूल प्रशासनालाच चपराक दिली. वृत्तपत्रात प्रसिद्धी न देता केवळ जाहीरनामा काढून ही लिलाव प्रक्रिया महसूल प्रशासनाने कधी राबविली, हा मुख्य प्रश्न येथे उपस्थित होतो. महाराष्ट्र सीमेतील रेती मध्यप्रदेशात जात असल्याची माहिती आहे.तुमसर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी नदी पात्रातून नियमबाह्य अवैध रेती उत्खनन करण्यात आली. आष्टी व पांजरा (रेंगेपार) नदी काठावर १२२८ ब्रास रेती डम्पींग करण्यात आली होती. या रेतीचा महसूल प्रशासनाने १९ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात लिलाव करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले, तहसीलदार डी.टी. सोनवाने, नायब तहसीलदार मडावी, गोंड तथा इतर कर्मचारी उपस्थित होते.पांजरा (रेंगेपार) नदी काठावर ५२८ ब्रास अवैध रेती साठा होता. याची महसूल प्रशासनाने ७ लाख ९२ हजार इतकी किंमत निर्धारीत केली. लिलावात एकुण १२ कंत्राटदार सहभागी झाले. प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेत ४ ते ५ जणांनीच सहभाग घेतला. अवघ्या सात ते दहा मिनिटात लिलाव प्रक्रिया संपली. ८ लाख एक हजारावर बोली थांबली. मुळ किमतीत केवळ नऊ हजार रुपयांची वाढ झाली. येथे अनामत रक्कम १ लाख ९८ हजार रुपये ठेवण्यात आली होती. आष्टी येथे बावनथडी नदी पात्रातून अवैध रेती उत्खनन करून ७०० ब्रास रेती नदी काठावर खासगी शेतजमिनीत ठेवली होती. महसूल प्रशासनाने या रेती साठ्याची किंमत १० लाख ५० हजार रुपये आकारली होती. येथे लिलाव प्रक्रियेत केवळ सहा कंत्राटदार सहभागी झाले होते. १० लाख ६२ हजार रुपयात हा रेती साठा लिलाव झाला. म्हणजे केवळ १२ हजारांची वाढ झाली. कंत्राटदारांनी महसूल प्रशासनाला येथे चपराक दिल्याची चर्चा शहरात होती.महसूल प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला १५ दिवसांची रेती उचल करण्याची परवानगी दिली. ट्रॅक्टरकरिता एक ब्रास व ट्रक करिता दोन ब्रासची येथे परवानगी आहे. तुमसर पोलीस ठाण्यात टी.पी. चा हिशोब राहणार आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत रेतीची वाहतूक करण्यात यावी, असे बंधन महसूल प्रशासनाने केले आहे. येथे आष्टी व पांजरा (रेंगेपार) घाट ज्या कंत्राटदाराला पूर्वी होता. त्याच कंत्राटदार व त्यांच्या सोबत्याला डम्पींग रेती साठा लिलावात मिळाला हे विशेष. ३० सप्टेंबर पर्यंत रेती घाटांची मुदत होती. त्यामुळे या रेतीला मोठी किंमत प्राप्त झाली आहे. एका ट्रकमध्ये चार ते पाच ब्रास रेती वाहतूक केली जाते. रेतीच्या वाहतुकीमुळे या मार्गावरील रस्त्याची दूरवस्था झाली आहे.