रंजित चिंचखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा आणि बावनथडी नदी खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असले तरी, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे.जिल्ह्यात रेती घाटांचे लिलाव लांबणीवर गेली आहे. घाटाचे लिलाव झाले नसले तरी रेतीच्या मागणीत घट झाली आहे. चोरीच्या प्रकारातून रेतीचा उपसा करण्यात येत असल्याने गावातील रेतीची मागणी विदर्भातील अनेक जिल्ह्यात होत आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी सिहोरा परिसरातील नदी काठावरील गावात रेती माफीयांचा उदय झाला आहे. या व्यवसायात गावचे प्रतिष्ठित नागरिक तथा जबाबदार लोकप्रतिनिधी गुंतले आहे. या रेतीमाफियांनी वन, महसूल आणि अन्य विभागाचे कर्मचारी यांचेसोबत साटेलोटे केली आहे. वैनगंगा नदी काठावरील पांजरा घाटावरुन रेतीचा उपसा करण्यात येत आहे. या रेतीचे डम्पींग यार्ड कर्कापूर परिसरातील शेत शिवारात करण्यात आले आहे. शेतशिवार रेतीच्या ढिगाºयांनी हाऊसफुल झाली आहे. दिवसाढवळ्या डम्पींग यार्डात रेतीचा उपसा केल्यानंतर या रेतीची विल्हेवाट रात्रभर केली जात आहे. जेसीबी मशीनच्या सहाय्याने रेतीचा उपसा करतांना जप्तीची भिती या माफियांना आहे.तुमसर राज्यमार्गाच्या शेजारी असणाºया हरदोली येथील जिल्हा परिषद शाळेचे मागे असणारे डम्पींग यार्ड अन्य जागेत हलविण्यात आले आहे. शेतशिवारातून जाणारे पांदन रस्ते रेतीच्या डम्पींगने फुल्ल झाली आहेत. याच नदीकाठावरील मांडगी, परसवाडा, चुल्हाड देवरी(देव), सुकळी (नकुल), बपेरा गावांचे शिवारात डम्पींग यार्डाचा महापुर आलेला आहे. डम्पींग यार्ड खाजगी आणि बहुतांश वनविभागाचे जागेत तयार करण्यात आली आहे. परंतु वन विभागाने या डम्पींगधारक माफियांचे विरोधात कारवाईकरीता पुढाकार घेतला नाही. बावनथडी नदीशेजारी असणाºया गावाचे शिवार राखीव जंगल आहे. याशिवाय झुडपी जंगलाचे बहुतांश क्षेत्र आहे. याच राखीव जंगलात चोरट्या रेतीचे डम्पींग यार्ड तयार करण्यात आली आहे.वारपिंडकेपार, सोंड्या, सक्करधरा, घानोड गावाचे शिवारात रेती तस्करांचा उदय झाला आहे. बावनथडी नदी काठावरील घानोड, कवलेवाडा व अन्य शेजारी गावात डम्पींगची आवश्यकता नसली तरी रात्रीचे सुमारास थेट नदीचे पात्रात ट्रकमध्ये जेसीबी मशीनच्या सहायाने रेतीचा उपसा करुन ट्रक आणि मशीन पसार केली जात आहे.या परिसरात बोगस रायल्टी विक्रीचा गोरखधंदा सुरु करण्यात आला आहे. रात्री १० आणि पहाटे ४ वाजताच्या सुमारास ५० ते ७० ट्रकमध्ये रोज रात्री रेतीची निर्यात केली जात आहे. अनधिकृत रेतीची विक्री करीत असतांना माफियांचे रोजंदारी व्यक्ती हरदोली, महालगाव, सिहोरा आणि नाकाडोंगरी गावाचे चौकात महाराष्टÑ शासन आणि भारत सरकार अशा दाखल होणाºया वाहनाचा शोध घेत आहेत. असे वाहन शिरकाव करतांच भ्रमणध्वनी वरुन सतर्क होण्याचे सुचना देण्यात येत आहे.या परिसरात डोक्याला ताप आणणारी रेतीचे यार्ड असतांना वाहन तथा जप्तीची कारवाई करण्यात आली नाही. या व्यवसायात अधिक नफा असून जीएसटी देण्याचे भय नसल्याने मुळ व्यवसायाला तिलांजली देत रेतीच्या चोरीत हरदोली शिवारात काही तरुण गुंतले आहेत.महसूल अनभिज्ञसिहोरा परिसरात मोठ्या प्रमाणात रेतीचे डम्पींग यार्ड तयार करण्यात आले आहे. हा प्रकार सर्वांना माहिती आहे. तलाठ्यांसह मंडळ अधिकारी या परिसरातून नेहमीच आवागमन करतात. परंतु त्यांना हे डम्पींग यार्ड दिसत नसावे, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महसूल विभागाच्या वरिष्ठांनी यावर कारवाई करावी, अशी मागणी आहे.
सिहोरा परिसरात रेती डम्पिंग यार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 9:51 PM
वैनगंगा आणि बावनथडी नदी खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नदी काठावरील गावात अनाधिकृत डम्पिंग यार्ड तयार करण्यात आला आहे. नद्यांच्या पात्रातून दिवसाढवळ्या रेतीचा उपसा करण्यात येत असले तरी, रात्रीच या रेतीची विल्हेवाट लावण्यात येत आहे.
ठळक मुद्देवैनगंगा, बावनथडी नदीपात्रात उपसा : वन व महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष