तहसीलदार म्हणतात चौकशी करू : मध्यप्रदेशात जास्त क्षमतेची रेती वाहतूक सुरूमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेती उत्खनन व वाहतुकीचे नियम महसूल व खनिज विभागाने घालून दिले आहेत. परंतु तुमसर तालुक्यातील मांडवीत वैनगंगा नदीपात्रातून सीमांकनाबाहेरून रेतीचे उत्खनन मागील दीड ते दोन महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती आहे. क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतूक करून ती मध्यप्रदेशात नेली जात आहे १२ ते १५ कि़मी. नंतर मध्यप्रेदशाची सीमा प्रारंभ होते. येथे रेती वाहतुकीचा गोरखधंदा कुणाच्या सुरू आहे हा मुख्य प्रश्न आहे.तुमसर तालुका मुख्यालयापासून १५ कि़मी. अंतरावर मांडवी नि येथे वैनगंगा नदी वाहते. येथील नदीघाटाचा रेती उत्खननाकरिता लिलाव झाला होता. रेतीउत्खनन सुरू आहे. लिलावातील सीमाबाहेरून सर्रास रेतीचे येथे उत्खनन सुरू आहे. महसूल विभाग येथे सीमांकन करून देतो. खनिकर्म विभागाच्या नियम व अटींची येथे पूर्तता केली जात नाही. महसूल व खनिकर्म विभागांचे येथे दुर्लक्ष दिसत आहे. दुर्लक्ष करण्याची कारणे हा संशोधनाचा विषय आहे.तलाठी, मंडळ अधिकारी व तहसीलदारांचे रेती घाटावर नियंत्रण ठेवतात. परंतु सीमांकनाबाहेरून रेतीचे उत्खनन सुरू असल्याने कर्तव्यावर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जास्त क्षमतेचे ट्रक बहुधा मध्यप्रदेशात वाहतूक करणे सुरू आहे. रेती खनन करण्याच्या अटी व शर्तीचे अतिशय कडक नियम असतानी येथे नियम कसे शिथील झाले हा मुख्य प्रश्न आहे.रेती वाहतूक करतानी वाहतूक पासेस संबंधित विभागाकडून देण्यात येतात. वजन जास्त व पास मध्ये नोंदी कमी अशी स्थिती येथे सुरू आहे. परंतु याकडे कुणी पाहत नसल्याचे चित्र आहे. नदीपात्रात सीमांकन कुठून कुठपर्यंत केले. याची माहिती संबंधित अधिकारी व कंत्राटदारांनाच माहिती असते. त्यामुळे इतरांना यातील काही कळत नाही. सीमांकनाबाहेरून खणन केले जाते. रेती घाटावर किमान संंबंधित विभागाने पाळत ठेवण्याची गरज आहे.
मांडवी घाटातून सीमांकनाबाहेरून रेती खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 12:39 AM