लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रोहा रेती घाटावरून कुशारी मार्गे मोहाडीला येणाऱ्या रेतीच्या टिप्परने कुशारी येथील एका बैलबंडी ला मागून जोरदार धडक दिली. यात बैलबंडी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यामुळे दोन्ही बैल गंभीर जखमी झाले तर बैलबंडी चालक नालीत पडल्याने थोडक्यात बचावला. मात्र टिप्पर मालक व बैलबंडी चालक यांच्यात समझोता झाल्याने याची तक्रार पोलिसात करण्यात आली नाही.रेती घाटातून रेती भरून एक टिप्पर कुशारी, मोहाडी मार्गे नागपूरला जात असताना बैलबंडीला मागून जोरदार धडक दिल्याने बैलबंडी रस्त्याच्या कडेला हवेत फेकल्या गेली. दैव बलवत्तर म्हणून बैलबंडी चालक थोडक्यात बचावला. मात्र दोन्ही बैल गंभीर जखमी झाले त्यापैकी एका बैलाचा मृत्यू झाला असल्याचे समजते. टिप्पर मालक व बैलबंडी मालक यांच्यात आर्थिक देवाण-घेवाण झाल्यामुळे या घटनेची पोलिसात तक्रार करण्यात आलेली नाही रेती वाहून नेणारे ट्रक बेभान पणे ट्रक चालवत असल्यामुळे आजपर्यंत अनेक अपघात घडलेले आहे.आठ दहा दिवसांपूर्वीच त्याच रस्त्यावर कुशारीच्या एका बैलाला रेतीच्या टिप्परने धडक दिली होती व त्याची तक्रार मोहाडी पोलिसात करण्यात आली होती. घटनेच्यावेळी रेती भरून येणारे तीन टिप्पर ना नागरिकांनी अडविण्यात आले होते. व ते पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले होते, रेतिच्या टिप्पर वर तीन लक्ष रुपयाच्या जवळपास दंड होत असल्यामुळे टिप्पर मालकाने ही घटना पोलिसांपर्यंत जाऊ दिली नसल्याची माहिती आहे.
रेतीच्या टिप्परची बैलबंडीला धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:07 PM
रोहा रेती घाटावरून कुशारी मार्गे मोहाडीला येणाऱ्या रेतीच्या टिप्परने कुशारी येथील एका बैलबंडी ला मागून जोरदार धडक दिली. यात बैलबंडी रस्त्याच्या कडेला फेकली गेली. त्यामुळे दोन्ही बैल गंभीर जखमी झाले तर बैलबंडी चालक नालीत पडल्याने थोडक्यात बचावला. मात्र टिप्पर मालक व बैलबंडी चालक यांच्यात समझोता झाल्याने याची तक्रार पोलिसात करण्यात आली नाही.
ठळक मुद्देएका बैलाचा मृत्यू : चालक थोडक्यात बचावला