केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतो आहे, शेतकऱ्यांच्या विरुद्ध केंद्र सरकार काम करत आहे, म्हणून लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले, तसेच वेळोवेळी राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला सूचना दिल्या आणि शेवटी त्यांचे पालन केंद्र सरकारने केले. त्यामुळे देशाचे नेतृत्व येणाऱ्या काळात राहुल गांधी यांनी करावे, असा संकल्प लाखनी तालुका युवक काँग्रेसच्या वतीने विविध ठिकाणी युवकांनी घेतला. दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाचे असलेला गॅस सिलिंडर जो काँग्रेसच्या काळात ४०० रुपयांना भेटत होता, तो आता ९०० रुपयांना भेटतोय, म्हणून लाखनी तालुका महिला काँग्रेसच्या वतीनेही केंद्र सरकार विरुद्ध निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे लाखनी तालुकाध्यक्ष राजू निर्वाण, जिल्हा उपाध्यक्ष शफी लद्धानी, महासचिव धनंजय तिरपुडे, ज्ञानेश्वर राहंगडाले, सेवादल जिल्हाध्यक्ष कैलास भगत, डॉ.चंद्रकांत निंबार्ते, जयकृष्ण फेंडरकर, आकाश कोरे, रूपलता जांभुळकर, माजी नगराध्यक्षा कल्पना भिवगडे, अनिल निर्वाण, भोला उइके, प्रदीप तितिरमारे, सरपंच देवनाथ निखाडे, मनोहर बोरकर, परसराम फेंडरकर, वीणा नागलवाडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत वाघाये, अनुसूचित जाती विभाग तालुक्याध्यक्ष रितेश कांबळे, माजी सभापती खुशाल गिदमारे, रजनी आत्राम, मोरेश्वरी पटले, घनश्याम देशमुख, पंकज श्यामकुवर, सेवादल शहर अध्यक्ष अनिल बावनकुळे, प्रिया खंडारे, शाहीन पठान, विकास वासनिक, जयंत वाघाये, महादेव गायधनी, सुनंदा धनजोडे, विजय वाघाये, मोहन निर्वाण, नितीन भालेराव, सोहेल मेमन, योगेश गायधने, भैरव सार्वे, कुंदन आगाशे, हेमंत बडवाइक, रूपचंद सोनवणे, नामदेव राऊत, अरुण डोरले, मंगेश धांडे, जितेंद्र दोनोडे, गणेश बोडनकर, संदीप बावनकर, दिलखुश बागडे, भारत सारवे, ताराचंद वाघाये, परमानंद मेनपाले, भागवत मेश्राम, हेमंत सेलोकर, शंकर खराबे, सविता गौरे, सुमेध मेश्राम, मनोहर चुटे, अनिल बोधनकर, दीना भस्मे, रामनाथ पारधीकर, भाऊराव राणे, सचिन भांडारकर, मार्तंड बडोले, राजू निर्वाण केसलवाडा फाटा, मनोज निर्वाण, सत्यवान मेश्राम, केशव बोळणे आदी मान्यवर पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत वाघाये यांनी केले.