त्याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीमातेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये पंडित राजकुमार दुबे यांनी संस्कृत हे सर्व भाषांची जननी आहे. त्याचबरोबर आपल्याला संस्कृत भाषेला जपायला पाहिजे. सोबतच आपल्या रोजच्या दैनंदिन भाषेसोबतच संस्कृत भाषासुद्धा वापर करायला पाहिजे जास्तीत जास्त भाषेची ओळख असल्यास आपल्या मस्तकाच्या विकास होतो, असे त्यांनी सांगितले. मुख्य मार्गदर्शक आणि कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी संस्कृती सर्वात प्राचीन भाषा आहे, ही सर्वांना अवगत करायला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी कार्यकारी प्राचार्य डॉ.अनिल गायकवाड, डॉ. संजय पाखमोडे, डॉ. रमेश अग्रवाल,डॉ. राजकुमार भगत, डॉ. पल्लवी देशमुख, प्रा. दिवाकर कामडे उपस्थित होते. संचालन प्राध्यापक देवेंद्र इसापुरे यांनी, प्रस्तावना डॉक्टर सुनील कुमार चतुर्वेदी यांनी तर आभार पुखराज लांजेवर यांनी मानले. कार्यक्रमासाठी अशोक मीना, साहिद सय्यद आदींनी सहकार्य केले.
साकोली येथे संस्कृत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:43 AM