लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे घर पाडल्याच्या निषेधार्थ आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसच्या किसान मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले. यावेळी प्रभारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी शनिवारपर्यंत मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. मात्र तोपर्यंत शिवलालच्या दोन्ही मुलांनी उपोषण सुरु ठेवण्याचा निर्धार केला.तालुक्यातील सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे अतिक्रमीत घर सरपंच व तहसीलदार यांनी जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त केले. राजकीय दबावातून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप होत आहे. सध्या जिल्ह्यात सिरसोली प्रकरण चांगलेच गाजत आहे. आपल्या वडीलांना न्याय मिळावा म्हणून शिवलालची दोन्ही मुले पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसली आहे. मात्र न्याय मिळत नसल्याने आज मोहाडी तहसीलवर मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार नाना पटोले, राजू कारेमोरे, पंकज कारेमोरे, आशिष पातरे यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे यांना निवेदन दिले. यावेळी २९ जूनपर्यंत शिवलालला घराचा पट्टा देण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र मोर्चेकरी आजच निकाल द्या या मागणीवर ठाम होते. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.या मोर्चात माजी खासदार मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, राजू कारेमोरे, नरेश डहारे, धनंजय दलाल, रमेश पारधी, प्रमोद तितीरमारे, सीमा भुरे, अनिल काळे, अरविंद येळणे, नरेश ईश्वरकर, किरण अतकरी, राजेश हटवार, के. के. पंचबुध्दे, सुनील गिरीपुंजे, अमर रगडे, प्रभू मोहतुरे, रिता हलमारे, मनिषा गायधने, मोहाडीच्या नगराध्यक्षा गीता बोकडे, शोभा बुरडे, कविता बावणे, वंदना मेश्राम, कमलेश कनोजे आदी सहभागी झाले होते.
सिरसोली प्रकरणात मोहाडी तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 10:05 PM
तालुक्यातील सिरसोली येथील शिवलाल लिल्हारे यांचे घर पाडल्याच्या निषेधार्थ आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व काँग्रेसच्या किसान मजदूर सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
ठळक मुद्देएसडीओंना निवेदन : हजारोंची उपस्थिती