समित्यांची नोंदच नाही अनेक मंडळ बरखास्त पुतळ्याचे सौंदर्य हरपले सिहोरा परिसरात ५४ पुतळे चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा परिसरातील गावात महापुरुषाचे, देवी देवतांचे पुतळे उभारण्यात आली आहेत. परंतु या पुतळ््यांचे सौंदर्य हरपले आहेत. निधी आणि दुर्लक्षीतपणामुळे पुतळ््यांचा परिसर विकसित झालेला नाही. याकरिता महिला सरपंच एकवटली आहेत. पुतळ््याची सुरक्षा करणाऱ्या यत्रंणेची नोंद केली जाणार असल्याची माहिती या सरपंचांनी दिली आहे.गावात विविध जाती, धर्मांचे नागरिक वास्तव्य करित आहेत. सर्वधर्मसमभावाची जोपासना गावकरी करीत आहेत. गावात याच धार्मिक भावनेतून महापुरुषांच्या पुतळ््याची उभारणी करण्यात आली आहेत. आराध्य दैवतांचे मंदिर आणि देवस्थान गावात आहेत. या महापुरुषांच्या पुतळ््याचे सौंदर्य करण्याची जबाबदारी स्थापन करण्यात आलेल्या पुतळा सुरक्षा समिती तथा युवा मंडळाची आहे. परंतु रोजगारांच्या शोधात अनेक गावातील वस्त्या रिकाम्या झालेल्या आहेत. गावात तरुण पिढी दिशेनासी झाल्याने पुतळ््यांचे सौंदर्यकरण अडचणीत आले आहे. शासन स्तरावर ग्रामपंचायतींना अनुदान देण्यात येत नाही. निधी उपलब्ध करण्याची तरतुद नसल्याने पुतळा परिसराचे सौंदर्य अडचणीत आले आहे.याच पुतळा परिसरात बाग बगीचा तयार केला जावू शकतो. परंतु निधीची चणचण विकासाला आडकाठी ठरत आहे. या पुतळ््याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मंडळांची नोंद यंत्रणेच्या दस्तऐवजात नाही. यामुळे मंडळांचे नेतृत्व चिरकाल टिकणारे नाही. सिहोरा परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे २१ पुतळे आहेत. तथागत महात्मा गौतम बुध्द २३, राष्ट्रपिता महात्मा गांधी २, अन्य महापुरुष ८, असे एकूण ५४ पुतळे आहेत. या शिवाय मंदिराची संख्या ६५ आहे. बौध्द बांधवाचे ६ विहार आहेत. तर मस्जिद १ आहे.स्मशानभूमीत भगवान भोलेनाथचे पुतळे उभारली जात आहेत. सार्वजनिक जागेत असणाऱ्या पुतळ््याची जबाबदारी ग्रामपंचायतची आहे. या पुतळ््याचे सौंदर्यकरणाला आधार तथा निधी देतांना सामान्य फंडाची आठवण केली जात आहे. धार्मिकरित्या लोकवर्गणीतून देवस्थानाची जोपासना केली जाते. परंतु अल्प लोकवर्गनी असल्याने ग्रामीण भागात मंदिर आणि पुतळ््याचे कायापालट होत नाही. पार्क निर्मितीचा संकल्प गावात असतांना निधी प्राप्त होत नसल्याने गावाचे चित्र भकास झाले आहे. गावात जागा आहे. परंतु मॉडेल तयार करणारे चित्र निर्माण होत नाही. गाव घडविण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रतिसाद देत नाही. सौदर्यकरणात भर घालणारे मॉडेल तयार करण्याची गरज आहे.(वार्ताहर)गावात पुतळे आणि मंदिर आहेत. पुरातन ठेवा जपुन ठेवण्यासाठी धडपड होत आहे. अनेक मंदिराचे जीर्णोद्वार निधीअभावी अडले आहे. दोन नद्यांचा संगम गावात असतानाही परिसराचा विकास झाला नाही.- साधना वाल्दे, सरपंच बपेरागावात असणारे पुतळे आणि मंदिरांची देखरेख स्थापन करणारे मंडळे करित असून, या मंडळांची तथा कार्यकारी पदाधिकाऱ्यांची नोंद निश्चितच ग्राम पंचायतमध्ये असली पाहिजे. वार्षिक पुतळे आणि मंदिरांची रंगरंगोटी करणार आहे.- विमल कानतोडे , सरपंच मोहाडी (खापा)परिसरात नद्यांचे सौंदर्य आहे. हिरवळ विस्तारलेली आहे. परंतु पर्यटक आणि भाविकांना आकर्षित करणारा मॉडेल नाही. तिर्थस्थळाचा पर्यटन निधीमधून मॉडेल तयार करण्याची गरज आहे. नद्यांचे सौंदर्यकरण केल्यास पर्यटकांना भुरळ घालणार आहे.- अजंली पारधी, गृहीणी वारपिंडकेपारदेवरी (देव) गावात मुस्लिम बांधवाचे श्रध्दास्थान असणारी दरगाह आहे. परंतु गावात मुस्लिम बांधवाचे वास्तव्य नाही. या दरगाहाची जोपासना हिंदु आणि बौध्द बांधव करित आहेत. या स्थळाचा विकास झालेला नाही. लोकप्रतिनिधींनी अनुदान देण्याची गरज आहे.- प्रेरणा तुरकर, सरपंच देवरी(देव)चुल्हाडच्या स्मशानभूमीत भगवान भोलेनाथाची मुर्ती स्थापन करण्यात येत आहे. या स्मशानभूमीचा प्रथमत:च सौदर्यकरण होणार आहे. अन्य पुतळ््याची जोपासना करण्यासाठी विशेष निधीची गरज आहे.- रेखा सोनेवाने , सरपंच चुल्हाड
पुतळ्यांच्या सुरक्षेवरुन सरपंच एकवटले
By admin | Published: April 18, 2015 12:22 AM