साकोली तालुक्यात ६२ ग्रामपंचायती आहेत. त्यातील बहुतांश ग्रामपंचायतीकडे पथदिव्याचे वीज बिल थकीत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर महावितरणने थकीत वीज बिलापोटी पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला. गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. रात्री शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. मात्र आता अंधारामुळे सरपटणाऱ्या विषारी प्राण्यांची भीती असते. पथदिवे का बंद आहे, असा जाब गावकरी थेट सरपंचांना विचारत आहे. वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी वीज वितरणवर धडकले. कार्यकारी अभियंता स्मिता पारखी यांना निवेदन दिले. यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवन शेंडे, सचिव प्रेम गहाणे, उपाध्यक्ष नयना चांदेवार, उषा डोंगरवार, भीमावती पटले, मुकेश कापगते, प्रल्हाद शेंदरे, खेमेश्वरी टेंभरे, संजय बडवाईक, हरिष लांडगे, पुरुषोत्तम रुखमोडे, वनिता बोरकर, गायत्री टेंभूर्णे, भूमिका तिडके, अल्का उपरीकर, कुंदना वाढई उपस्थित होते.
सरपंच संघटना धडकली महावितरणवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 4:24 AM