लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्न म्हटलं की कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या ध्यानी येत असले तरी त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे. यामुळे येणाऱ्या युवा पिढीवर याच चार अक्षतांचे दाणे वाचविण्याची वेळ आली आहे. या चार दाण्यातून कुणाच्या दोन वेळेच्या जेवणाची सोय होऊ शकते हे विसरता कामा नये.लग्नात वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची पद्धत अनादी काळापासून सुरू आहे. यात मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि ज्वारी या धान्याची नासाडी होते. लग्न लागण्याच्या वेळी येणाºया प्रत्येक वºहाड्याच्या हातात अक्षता म्हणून तांदळाला कुंकू व ज्वारीला हळद लावण्यात येते. आजघडीला अक्षता वाटण्याच्या पद्धती बदललेल्या आहेत. मंडपात प्रवेश होताच प्लॉस्टिकच्या छोट्या पाकिटात तांदळाची व दुसºया पाकिटात ज्वारीची अक्षता हातात पडते. लग्न समारंभ आटोपल्यानंतर मंडपात कुठे प्लॉस्टिकची रिकामी पाकिटे तर तर कुठे रंगबेरंगी तांदळाचा सडा दिसून येतो. मंडपात असणाऱ्यांचे याकडे लक्ष जाते. मात्र कुण्या गरजवंतांची चार मुले जेवू शकतील, याचा विचार कुणाच्या मनात येत नाही.लग्न समारंभ दिवसेंदिवस प्रतिष्ठेचा सोहळा ठरत आहे.या प्रतिष्ठेमुळे धान्य पायदळी तुडवल्या जात आहे. मात्र त्यात बदल करण्याची इच्छा कुणाच्याही मनात येत नाही. जीवनाचे वास्तव सांगणाºया राष्ट्रसंतांनी या गोष्टीचा उलगडा तेव्हाच केला होता. त्यांनी सांगितलेले वास्तव अनेकांना कळले असले तरी अंमलबजावणी मात्र कुणीही करीत नसल्याचेच दिसून येत आहे.आतातरी तांदळाचे महत्त्व लक्षात घेता पुरातन रुढी परपंरेचा पगडा मिरविणे सोडून तांदळाची नासाडी थांबविण्यासाठी प्रत्येकांनी पुढाकार घेतल्यास यावर आळा बसू शकेल, यात शंका नाही.रूढ झाली अक्षतांची पद्धतलग्नात वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकतात. ही पद्धत पुरातन आहे. अक्षता हे पुर्णतेचे लक्षण आहे. धान्यात तांदूळ हे संपन्नतेचे लक्षण असल्यामुळे हा प्रकार सुरू झाला. प्राचीन काळापासून देशात धान्याच्या अक्षता तयार करून त्या वधू वरांच्या डोक्यावर टाकण्यााची ही प्रथा आजही कायम आहे.अन्न हे पोट भरण्याचे साधन आहे. अन्न पायाखाली आल्यास त्याचा अपमान होतो, असे भारतीय संस्कृतीत म्हटले आहे. अन्न वाचविण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. परंतु लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात धान्य पायदळी तुडविले जातात.पाखरांना धान्य देण्याकडे कानाडोळावाढत्या उन्हात पक्ष्यांना अन्न मिळणे कठिण होते. यामुळे छतावर, घरी असलेल्या झाडावर पाणी आणि अन्न ठेवण्याची गरज आहे. मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते. हीच मंडळी लग्नात अक्षतांच्या रुपाने धान्य फेकण्यात पुढे राहतात.फुलांना पसंतीकुणाचे स्वागत करायचे असेल तर फुलांचा वापर करण्यात येतो. फुलांशिवाय स्वागत अशक्यच असल्याचे दिसत आहे. फुलांशिवाय धार्मिक कार्य होत नाही. लग्नाच्या वेळी नवदाम्पत्याचे स्वागत फुलांच्या माध्यमातून केले तर वावगे काय. वधू-वरांच्या डोक्यावर अक्षता फेकण्यापेक्षा त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्याचा विचार करणे गरजेचे आहे.आज ती परिस्थिती नाहीवधू-वरांच्या डोक्यावर अक्षता टाकण्याची सुपिकतेमुळे अस्तित्वात आल्याचा उल्लेख आहे. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. उत्पन्नही घटले आहे. सुपिकताही कमी झाली. शेतात पीक येत नसल्याने शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. यामुळे अक्षतांच्या नावावर धान्य फेकण्याच्या या पद्धतीला बगल देण्याची गरज आहे.वाया घालविणार पण देणार नाहीलग्न समारंभात अक्षतांच्या नावावर धान्य फेकणाºयांकडे जर कुणी धान्य मागण्याकरिता गेले तर त्याला समोर जा, असे सांगून हाकलून लावणारे अनेक महाभाग आहेत. मात्र विवाहाची वेळ आल्यास धान्याची उधळण करीत प्रतिष्ठा जोपासणारेही कमी नाहीत.
चार दाणे वाचवू या, चिमण्या पाखरांसाठी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 10:34 PM
लग्न म्हटलं की कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या ध्यानी येत असले तरी त्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे.
ठळक मुद्देलग्न मंडपात तांदळाचा खच : पाखरांना, मागणाऱ्यांना मिळतो नकार, पारंपरिक पद्धतीला फाटा देण्याची गरज