लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील स्नेहा कन्या विद्यालयात आयोजित ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत शिक्षिका प्रेरणा कंगाले, वैभवी गोमासे, वीरेंद्र देशमुख, ममता तुपे उपस्थित होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बौद्धिक स्पर्धा अंतर्गत निबंध लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी चित्रकला स्पर्धेच्या माध्यमातून तसेच विविध पोस्टर काढून विद्यार्थिनींनी स्त्रीभ्रूणहत्या या विषयावर प्रकाश टाकला. विविध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थिनी खुशी मेश्राम, प्रणाली निंबार्ते, खुशी उपाध्याय यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम सादर केले. संचालन प्रेरणा कंगाले यांनी केले तर आभार वैभवी गोमासे यांनी मानले.
पिंपळगाव येथे ‘लेक वाचवा लेक शिकवा’ अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 4:32 AM