भंडारा : दवडीपार बाजार येथील आदर्श विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राजेश धुर्व, प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक मारोती लांजेवार तसेच संजय सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थिनी आयुषी वैद्य, योगिनी वैद्य, आकांक्षा रेहपाडे, ऋतुराज खंगार यांनी भाषण स्पर्धेत सहभाग घेतला, तर ऋतुजा हजारे, वंश कावळे, दूरभाष जगनाडे यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला होता. सुनामी जगनाडे, दुर्गा लुटे यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेऊन आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक राजेश धुर्वे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त मार्गदर्शन केले असून मारोती मेश्राम, संजयकुमार सोनवणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी लीलाधर किरणापुरे, विजय कळंबे, प्रमोदिनी गोस्वामी, सुप्रिया टेंभुर्णी, प्रीती साखरवाडी, नलिनी हजारे, कांता कामथे, संदीप वलके, नेताजी कामथे, आदी उपस्थित होते.