सरपंच संगीता घोनमोडे यांनी गावातील महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर माहिती दिली. प्रत्येक स्त्रीने समाजात प्रेरणादायी रहावे. कुटुंबाची जबाबदारी निष्ठेने पार पाडीत राष्ट्रप्रेम जागृत ठेवावे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कर्तव्याची जाण देत प्रामाणिकता जपत गाव हिताकरिता पर्यायाने राष्ट्रहिताकरीता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा प्रत्येकाने पुढे चालू ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. उपस्थित सर्व महिला भगिनींनी क्रांतिज्योतींच्या प्रतिमेला पुष्पमाला व शब्द सुमनांनी अभिवादन केले. अंगणवाडी सेविका उर्मिला घोनमोडे, आशा वर्कर्स सुरेखा घोनमोडे यांनी फुले यांच्या जीवनावर गीत सादर केले.
कार्यक्रमाकरिता रुचिका घोनमोडे, ओमिनी घोनमोडे, श्वेता कातोरे, श्रुतिका कातोरे, मनीषा घोनमोडे, विद्या ढोके, भागिरथी मेश्राम, अलका कातोरे आदींनी सहकार्य केले.