तीन जणांविरुद्ध गुन्हे : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईभंडारा : राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्गावरील ५०० मीटर अंतरावरील दारूची दुकाने बंद झाल्यानंतर पोलीस कारवाईत वाढ झाली आहे. अशीच एक कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली आहे.१५ एप्रिल रोजी सालेबर्डी परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी अवैध वाहतुकीवर पाळत ठेऊन छापा घालण्यात आला. संतोष यादवराव मोहतुरे (३४) रा.भंडारा, युद्धराज बाबुराव मेश्राम (४०), मनोज रामकृष्ण मेश्राम (४०) रा.संगम (पुनर्वसन) यांच्या ताब्यातून एक चारचाकी व दोन दुचाकी, हातभट्टीची १५० लिटर व इतर साहित्य असा १ लाख १९ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपायुक्त उषा वर्मा, अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक एस.एच. मेहरकर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अरविंद कोटांगले, जियालाल अंबुले, जयघोष जनबंधू, संगीता गिऱ्हेपुंजे यांनी केली. (नगर प्रतिनिधी)
सव्वा लाखाची दारू पकडली
By admin | Published: April 17, 2017 12:20 AM