रुग्णांची हेडसांड : मागणी करुनही अत्यल्प साठा, खासगी रुग्णालयाकडे रुणांचा कलपालांदूर : वातावरणातील बदलामुळे पालांदूर परिसरात विषाणूजन्य तापाची साथ पसरली आहे. आरोग्य विभागाचे पथक तपासणीकरिता दाखल झाले आहेत. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी असते. रुग्णांच्या तुलनेत औषधसाठा कमी पडत असल्याने रुग्णसेवा प्रभावित होत आहे. आरोग्य विभागाने आरोग्य सुविधेसह औषधसाठा उपलब्ध करावा, अशी मागणी ढिवरखेडाचे सरपंच गजानन शिवणकर यांनी केली आहे.विषाणुजन्य आजारामुळे ताप, सर्दी, खोकला, दुखने अशी लक्षण वाढली आहे. रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य विभागाने सुविधा पुरविणे गरजेचे झाले आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी दररोजच डोअर टू डोअर भेट देवून उपचार करण्यावर भर देत आहे. गावकऱ्यांनीही वैद्यकिय अधिकाऱ्यांना दिलेल्या सहयोगाने साथ थांबविण्यास मदत होत आहे. मात्र रुग्णालयात सर्दी, खोकल्यांच्या औषधीचा साठाच उपलब्ध नसल्याने उपचाराकरिता अडचण येत आहे. जिल्हा परिषद सदस्य, रुग्णकल्याण समिती यांनी लक्ष देवून औषधसाठा नियमित करण्याची मागणी सरपंच शिवणकर यांनी केली आहे. (वार्ताहर)विषाणुजन्य तापाची साथ बारव्हा : नळाचे दूषित पाणी व बदलत्या हवामानामुळे बारव्हा परिसरात ताप, सर्दीची साथ जोमात सुरु आहे. मात्र येथील दवाखान्याचा अधिभार पारडी येथील आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांकडे असल्याने व दिवसेंदिवस रुग्णसंख्येत कमालीची वाढ होत असल्याने डॉक्टरांची तारांबळ उडत आहे. परिणामी रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार करावा लागत आहे.९ सप्टेंबरच्या सायंकाळी रुग्णाला सेवा देताना एका आरोग्य सेविकेने वैद्यकिय अधिकारी डॉ. कापगते यांना फोन करुन रुग्णाला औषध देण्यासंबंधी विचारले तेव्हा तेथीलच महिला डॉक्टरला डॉ. कापगते यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. प्रकरण चिघळले व महिला डॉ. सविता मालडोंगरे यांनी प्रकरणाची तक्रार पोलिसात दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून धावपळीत डॉ. कापगते यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठ फिरविली आहे. डॉ. मालडोंगरे या सुध्दा रजेवर आहेत. तात्पुरता कार्यभार पारडी आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. नंदेश्वर यांचेकडे सोपविण्यात आला. मात्र, साथीच्या आजारांनी परिसरातील नागरिकांना ग्रासले आहे. दररोज आरोग्य केंद्रात किमान दोनशेच्यावर रुग्णांच्या रांगा दिसून येत आहेत. वातावरणातील बदलामुळे रूग्णसंख्येत वाढ होत आहे. असे असतानाही आरोग्य विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णांची संख्या वाढत असल्याने येथे कार्यरत डॉक्टरला रूग्णसेवा देताना दमछाक होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरची सेवा अपूरी पडत असल्याने अनेक रूग्णांनी खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार करणे पसंत केले आहे. शासकीय रूग्णालयात मोफत सेवा मिळत असली तरी, सुविधेअभावी ठिकाणी त्वरित पुर्णवेळ डॉक्टरांची व्यवस्था करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)रुग्णाची मागणी रास्त आहे, वेळेवर औषधसाठ्याची मागणी करुनही अपेक्षित साठा मिळत नाही. एक -दोन दिवसात औषध येणार आहे, नाही आली तर स्थानिक रुग्णकल्याण निधीतून खासगीतून औषधी खरेदी करुन औषधोपचार करण्यात येईल.- डॉ. अभय थूल,वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पालांदूर.
रुग्णालयात औषधांचा तुटवडा
By admin | Published: September 19, 2015 12:39 AM