पाचवी व आठवीची प्रवेश प्रक्रिया : शिक्षण संचालकांचे निर्देशभंडारा : शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्राथमिक शाळांना पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याबाबतची कार्यवाही क्षेत्रीय स्तरावर सुरू केली आहे. पण चवथी किंवा सातवी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखल देण्यात येत नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. त्यामुळे या वर्गांमध्ये प्रवेशासाठी शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नसल्याचे आदेश शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी दिले आहे. शासनामार्फत जिल्हा परिषद शाळांमध्ये यंदाच्या सत्रापासून गरज असेल तिथे पाचवी आणि आठवीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांची धडपड सुरू आहे. पण अनेक ठिकाणी पाचवी किंवा आठवीत इतर शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरू आहे. त्यामुळे ते शाळा सोडल्याचा दाखला मागत आहे. पण जिल्हा परिषद शिक्षक पालकांना शाळा सोडल्याचा दाखला द्यायला तयार नाही. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००८ नुसार प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क आहे. नजीकच्या कुठल्याही शाळेत शिक्षण घेण्याचा नैतिक अधिकारही आहे. त्यामुळे अशा प्रकारे शासन निर्णयाचा चुकीचा अन्वयार्थ लावून बालकाचा शाळा सोडल्याचा दाखल रोखून धरणे योग्य नाही. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांस त्याच्या ऐच्छिक शाळेत प्रवेश घेण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी शाळा सोडल्याचा दाखल देणे बंधककारक आहे. त्यामुळे शिक्षणाचा हक्क अधिनियमातील तरतुदीनुसार नवीन शाळेत प्रवेश घेताना शाळा सोडल्याचा दाखल सादर करणे अनिवार्य नसल्याचे आदेश महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे. (शहर प्रतिनिधी)
शाळा सोडल्याचा दाखला अनिवार्य नाही
By admin | Published: May 09, 2016 12:38 AM