साकोली : शिक्षकांच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर अवघ्या दोन तासातच पाठविलेल्या शिक्षकाला परत बोलावून शाळा सुरू करण्याचा प्रकार सावरबंध येथे घडला. जिल्हा परिषद कनिष्ठ प्राथमिक शाळा सावरबंध या शाळेत वर्ग १ ते ५ असून या शाळेत ९६ विद्यार्थी आहेत. या शाळेत शिक्षकांची चार पदे मंजूर आहेत. या पदानुसार या शाळेत चार शिक्षकही होते. मात्र मागील आठवड्यात बोंडे येथे शिक्षकाच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा सावरबंध येथील शिक्षक टेंभुर्णे यांना बोंडे येथे पाठवून शिक्षण विभागाने शाळा बंद आंदोलन मागे केले. मात्र आज सावरबंध येथे शिक्षकाच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला. आज शाळेत पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच पाठविले नाही. या आंदोलनाची माहिती शिक्षण विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच शिक्षण विभाग हतबल झाले. साकोली तालुक्यातील शाळा बंद आंदोलनाची दखल घेत शिक्षणाधिकारी यांनी तात्पुरती शिक्षकाची सोय म्हणून मानधनावर शिक्षकाची सोय करावी, असे आदेश दिले. मात्र या आदेशाचे पालनच झालेच नाही. (तालुका प्रतिनिधी)
अन् दोन तासांत पुन्हा सुरू झाली शाळा
By admin | Published: December 23, 2014 10:58 PM