लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकमत बाल विकास मंच सदस्य अभियानाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साकोली, लाखनी, तुमसर, मोहाडी तालुक्यातून सदस्य अभियान सुरु आहे. वार्षिक सदस्य अभियानात निवडक शाळा किंवा लोकमत जिल्हा कार्यालयात १५० रुपये शुल्क देऊन प्रवेश मिळविता येईल.शाळानिहाय नोंदणी अभियान दि. ११ नोव्हेंबरपासून सकाळी ११ ते ३ या वेळेत रॉयल पब्लिक स्कूल बेला व अंकुर विद्यामंदिर भंडारा, दि.१३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत स्प्रींग डेल स्कूल व महिला समाज शाळा येथे सुरवात करण्यात येणार आहे. नोंदणी ठिकाणी प्रवेशपत्र व भेटवस्तू वितरित करण्यात येतील.सदस्य सदस्याला आकर्षक आयकार्ड, लंच बॉक्स (२५०रु.) चॅम्प बुक (१५०रु), एज्युकेअर कोर्स कुपन (१०००रु.), मॉडेलिंग फोटो कुपन (५०रु.) कॅम्प्युटर कोर्स कुपन (१०००रु.) व सर्व सवलती मिळून एकुण २५०० रुपये किंमतीचे भेटवस्तू व कुपन नि:शुल्क मिळणार आहे. सोबतच वर्षभर होणारे शैक्षणिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, क्रीडा स्पर्धा व प्रशिक्षणात्मक कार्यक्रमात सहभाग होण्याची संधी मिळेल. राज्यस्तरीय लकी ड्रा मध्ये भाग्यवान विजेत्याला नागपूर-दिल्ली हवाई सफर, मास्टर टॅलेन्ट कॉन्टेस्टमध्ये लॅपटॉप, टॅबलेट, डिजीटल कॅमेरा, स्मार्ट फोन, सायकल, क्रिकेट किट बक्षीसे जिंकण्याची संधी मिळेल. नोंदणीसाठी प्रमुख लाखनी तालुका पुजा निखाडे (७५१७०२९४९४), तुमसर तालुका राहुल (८२३७०६०५३३), सखी मंच संयोजिका रितू पशिने (८१७७९३२६१३) किंवा एज्युकेअर मातोश्री कॉम्प्लेक्स, नविन बसस्टँड जवळ तुमसर, मोहाडी तालुका जितेंद्र पराते (९५०३९१८१६६) यांचेशी, जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे ९०९६०१७६७७ किंवा लोकमत जिल्हा कार्यालयात साई मंदिर मार्ग भंडारा येथे ११ ते ५ या वेळेत संपर्क साधता येईल.
शाळानिहाय सदस्य अभियान आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 11:44 PM
लोकमत बाल विकास मंच सदस्य अभियानाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. साकोली, लाखनी, तुमसर, मोहाडी तालुक्यातून सदस्य अभियान सुरु आहे.
ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंचचा उपक्रम : २५०० रु. किंमतीचे भेटवस्तू व कुपन फ्री