लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील खुटसावरी मार्गावर असलेल्या बोधिचेतीय संस्थेच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बोधिचेतीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भदंत धम्मदीप महाथेरो यांनी केली आहे.बोधिचेतीय संस्था ही सन २००१ पासून पंजिबद्ध असून पर्यावरण विकास, विपश्यना, बालविकास केंद्र, पालिभाषा यासह विविध धार्मिक कार्यक्रम राबविण्यात येतात. या परिसरात गत महिन्याभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे बोधिचेतिय टेकडी परिसरात येणाऱ्या पर्यटकांना भीती व्यक्त होत आहे. या बिबट्याने अनेकदा नागरिकांना दर्शन दिले आहे. बोधिचेतिय संस्था अंतर्गत कामे करणाऱ्या मजुरामध्ये बिबट्याची धास्ती भरली असून महिन्याभरापासून कामावर येणे बंद केले आहे. रात्रीला बिबट्याची आरोळी ऐकू येते. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक ये-जा करतात. त्यांना बिबट्याची धास्ती वाटत आहे. वनविभागाने बंदोबस्त करावा, अन्यथा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवेदनावर सुष्मा वासनिक, चांगूना कांबळे, अर्चना खोब्रागडे, हर्षा टेंभूर्णे, रत्नमाला वासनिक, रेखा टेंभूर्णे, अनिल वासनिक, यशोधरा खोब्रागडे, मिना कांबळे, सुनंदा वासनिक यांच्या स्वाक्षºया आहेत.
खुटसावरी मार्गावर बिबट्याचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 12:47 AM
तालुक्यातील खुटसावरी मार्गावर असलेल्या बोधिचेतीय संस्थेच्या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. यामुळे नागरिकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी बोधिचेतीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भदंत धम्मदीप महाथेरो यांनी केली आहे.
ठळक मुद्देनागरिकांमध्ये दहशत : बंदोबस्ताची मागणी, वनविभागाला निवेदन