शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

सातोनात राशन दुकान केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 5:00 AM

संचारबंदीने लोकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत प्रत्येकच कुटुंब मोठ्या अडचणीत जीवन जगत आहेत. त्यांना पोट भरण्यासाठी शासनाच्या राशन दुकानाचा मोठा आधार आहे. परंतु काही राशन दुकानदार अशा परिस्थितीत नफाखोरी करण्यास मागे पुढे पाहत नाही. एकीकडे काही दानशूर व्यक्ती गरिबांना मदत करीत आहेत, तर दुसरीकडे काही दुकानदार काळाबाजार करीत आहेत.

ठळक मुद्देअन्नपुरवठा विभागाची कारवाई । कुजलेल्या निकृष्ट गव्हाचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सध्याच्या परिस्थितीत जनतेला अन्नधान्याची अत्यंत आवश्यकता असताना अधीक नफा कमविण्याच्या उद्देशातून सातोना येथील संताजी मजूर कामगार संस्थेच्या राशन दुकानातून खाण्यास अयोग्य सडलेला गहू वितरित करून कार्डधारकांची थट्टा उडवली जात होती. या राशन दुकानावर पुरवठा विभागाने कारवाई करून दुकान सील केली आहे.संचारबंदीने लोकांच्या हाताला काम नाही, अशा परिस्थितीत प्रत्येकच कुटुंब मोठ्या अडचणीत जीवन जगत आहेत. त्यांना पोट भरण्यासाठी शासनाच्या राशन दुकानाचा मोठा आधार आहे. परंतु काही राशन दुकानदार अशा परिस्थितीत नफाखोरी करण्यास मागे पुढे पाहत नाही. एकीकडे काही दानशूर व्यक्ती गरिबांना मदत करीत आहेत, तर दुसरीकडे काही दुकानदार काळाबाजार करीत आहेत. सातोना येथे संताजी मजूर कामगार संस्थेचे राशन दुकान असून ज्योतिष बडवाईक हे दुकान चालवितात. या महिन्याचे राशन वितरित करताना त्यांनी शासनाकडून मिळालेला उत्कृष्ट प्रतीचा गहू स्वत:करिता बाजूला ठेवून, स्वत:च्या शेतातील पावसाने सडलेल्या गव्हाचे वितरण कार्डधारकांना करणे सुरू केले. इतर गावातील राशन दुकानातून उत्कृष्ट प्रतीचा गहू मिळत असल्याने लोकांना संशय आला. याची तक्रार अन्न पुरवठा विभागाकडे करण्यात आली. ग्राम दक्षता समिती अध्यक्ष आणि कार्डधारकांच्या उपस्थितीत पुरवठा विभागाने राशन दुकानाची चौकशी केली असता स्वत:च्या शेतातील गहू वितरित करीत असल्याची बाब उघड झाली. तसेच शिल्लक साठ्यापैकी ३१.४५ क्विंटल गहूचा साठा अतिरिक्त आढळला, मग एवढे गहू आले कुठून, तर शिल्लक साठ्यापैकी ७.१९ क्विंटल तांदूळ कमी आढळून आला. तर तांदूळ गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित होतो. शिल्लक गव्हाच्या साठ्यात १५ क्विंटल गहू सडलेल्या स्थितीत निकृष्ट दर्जाचे आढळले. चौकशीत साठा व विक्री रजिस्टर, साठा फलक, दक्षता समिती फलक, तक्रार नोंद वही, आणि बिल पावती पुस्तक आढळून आले नाही. त्यामुळे सदर दुकान सील करण्यात आले असून उपरोक्त दुकान निलंबित करण्याची शिफारस जिल्हा पुरवठा अधिकारी भंडारा यांचेकडे करण्यात आली आहे.कारवाईत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सहभागसातोना येथे करण्यात आलेल्या कारवाईप्रसंगी नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, पुरवठा निरीक्षक सागर बावरे यांनी कार्डधारक देवेंद्र तायवाडे, मंदा चाफले, श्रीधर हटवार, पंचफुला डोहरे, खेमचंद खोब्रागडे, प्यारेलाल गजभिये, सूर्यकिरण रंगारी, दामोदर कुंडलकर, श्रावण हटवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :government schemeसरकारी योजना