लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पोलीस अधिकाऱ्यासह एका शिपायाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होताच पोलीस यंत्रणा हादरली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने बुधवारी पोलीस ठाण्याचा आवार आणि कर्मचारी वसाहतीसह अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेला परिसर सील करण्यात आला आहे.तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एक पोलीस शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले होते. यामुळे पोलीस वर्तूळात खळबळ उडाली होती. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि गोबरवाहीच्या ठाणेदारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच तुमसर ठाण्यातील ७० च्या वर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. ठाण्यातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून त्या ठिकाणी जिल्ह्यातून अधिकारी व १४ कर्मचाºयांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती.सदर पोलीस अधिकाºयाकडे राजापूर येथील नग्न धिंड प्रकरणाचा तपास आहे. या तपासादरम्यान जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारीही राजापूर येथे दाखल झाले होते. त्यावेळी सदर तपास अधिकाऱ्यांच्या संपर्कात हे अधिकारी आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सदर पोलीस अधिकारी नागपूर येथे प्राणघातक हल्ला प्रकरणातील जखमी महिलेच्या बयाणासाठी गेले होते. तेथून आल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने तपासणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
तुमसर ठाण्याचा आवार सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 5:00 AM
तुमसर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एक पोलीस शिपाई कोरोनाबाधीत असल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले होते. यामुळे पोलीस वर्तूळात खळबळ उडाली होती. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेले जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि गोबरवाहीच्या ठाणेदारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच तुमसर ठाण्यातील ७० च्या वर कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
ठळक मुद्देपोलीस अधिकारी व कर्मचारी पॉझिटिव्ह : वसाहतीचाही समावेश