नवरगाव येथील घटना : सहाव्या दिवशीही शोध नाही, पोलीस, ग्रामस्थ व वनविभाग कर्मचाऱ्यांची गस्त सुरूचविशाल रणदिवे अड्याळउन्हाळ्याचे दिवस असल्याने मोहफूल गोळा करणे हा ग्रामीणांसाठी व्यवसाय ठरला आहे. भल्या पहाटे गावातील महिला व पुरुष जंगलात जावून मोहफूल गोळा करतात. सवंगडी महिलासह गेलेली सुवर्णा रहस्यमय रित्या जंगलातून बेपत्ता झाली. कुणी म्हणतात तिला वाघाने खाल्ले तर कुणी म्हणतात तिचा खून करुन मृतदेहाची विल्हेवाट लावली. अशात जबाबदारी म्हणून पोलीस, ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी तिच्या शोधार्थ जंगल पालथा घालत आहे.भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पहेला-नवेगाव क्षेत्रातील घडलेली ही घटना. एखाद्या सिनेमात शोभावे अशीच ही घटना घडली. मात्र यातील बेपत्ता झालेली महिला अद्याप शोधण्यात कुणालाच यश आले नसल्याने या महिलेच्या रहस्यमयरित्या बेपत्ता होण्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती व विविध चर्चा रंगली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीणांना मोहफूल रोजगार उपलब्ध करुन देतो. त्यासाठी गावातील महिला-पुरुषांचे जत्थे जंगलात भल्या पहाटे जाऊन मोहफुल गोळा करतात. २६ मेच्या पहाटे नवरगांव येथील सुवर्णा कवडू गणविर (३५) ही गावातीलच काही महिलांसह मोहफुल वेचण्याकरिता जंगलात गेली होती. दरम्यान ती अचानक बेपत्ता झाली. याची माहिती तिच्यासह असलेल्या महिलांनी गावात येऊन दिली होती.सुवर्णाला वाघाने ठार केले. असा एकच हल्लकल्लोळ गावात पसरला. त्यामुळे ग्रामस्थ वनविभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांनी सुवर्णाला शोधण्यासाठी परिसरातील जंगलातील नदी, नाले पालथा घातला. एक-दोन दिवस नव्हे तर आज सहावा दिवस लोटला आहे. एवढ्या दिवसानंतरही सुवर्णा किंवा तिचा मृतदेह शोधण्यास अपयश आले आहे.
सुवर्णाच्या शोधात जंगल पालथे घातले
By admin | Published: June 01, 2016 1:41 AM