शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
4
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
5
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
6
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
7
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
8
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
9
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
10
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
12
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
13
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
14
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
15
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
16
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
17
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
18
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य
19
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
20
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे

भंडारा जिल्ह्यात दुर्मिळ धातूसाठी शोधमोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:46 AM

ग्रीन एनर्जीसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या रेअर अर्थ मेटलचा साठा (दुर्मिळ धातू) तुमसर तालुक्यात आढळण्याची शक्यता असून त्यासाठी भारतीय भूवैज्ञानिकांकडून तुमसर तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले.

ठळक मुद्देभूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण : खैरलांजी परिसरात केले उत्खनन

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ग्रीन एनर्जीसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या रेअर अर्थ मेटलचा साठा (दुर्मिळ धातू) तुमसर तालुक्यात आढळण्याची शक्यता असून त्यासाठी भारतीय भूवैज्ञानिकांकडून तुमसर तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. खैरलांजी परिसरात दगड फोडून भूगर्भात बोरवेल खोदून त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आहे.तुमसर तालुका हा मॅग्नीज खाणीसाठी संपूर्ण देशात प्रसिध्द आहे. आता या तालुक्यात रेअर अर्थ मेटल असण्याची शक्यता आहे. त्यासाठी गत पंधरवाड्यात भारतीय भूवैज्ञानिक या परिसरात येवून गेले. या पथकाने तुमसर तालुक्यातील सिहोरा राज्य मार्गावरील खैरलांजी शिवारात नाल्या शेजारी दगड फोडून भूगर्भात खोल बोरवेल खोदले. यासाठी अत्याधूनिक यंत्रांचा वापर करण्यात आला. सुमारे एक आठवडा हे पथक येथे तळ ठोकून होते. उर्वरित तुमसर तालुक्यातील इतर ठिकाणीही या पथकाने तपासणी केली. नागपूर येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक तथा काही अधिकाऱ्यांनी येथे भेटी दिल्या. येथील नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याच्या अहवालानंतर रेअर अर्थ मेटलचे अस्तित्व उजेडात येणार आहे.रेअर अर्थ मेटलचा शोध दगडात घेतला जात आहे. ग्रेनाईड, कॉर्बोनाईट व सेग्मेटाईटमध्ये याचा शोध घेतला जात आहे. खैरलांजी येथे अशाप्रकारचे मोठे दगड नाल्याशेजारी आहेत. दगडाला बोर करुन भूगर्भात खोल खड्डा तयार करण्यात आला आहे. याठिकाणी रेअर अर्थ मेटल आढळल्यास तुमसर पुन्हा जागतिक नकाशावर येणार आहे.रेअर मेटल करावे लागते चीनकडून आयातग्रीन एनर्जीला देशात मोठ मागणी आहे. यासाठी रेअर अर्थ मेटल अतिशय उपयुक्त आहे. तुमसर तालुक्यात रेअर मेटर असल्याने त्याचा शोध घेतला जात आहे. आशीया खंडात रेअर अर्थ मेटल चीनमध्ये सर्वाधीक आढळते. सध्या भारत चीनकडून त्याची आयात करीत आहे. या रेअर मेटलचा उपयोग बॅटरी, मोबाईल चिप, मेमरी कार्ड, पेनड्राईव्ह यासह अन्य इलेक्ट्रानिक उत्पादनात केला जातो. तुमसर सोबतच मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्येही रेअर अर्थ मेटलचा शोध घेतला जात आहे.जिल्हा खनीकर्म विभाग अनभिज्ञतुमसर तालुक्यातील खैरलांजी शिवारात आठवडाभर मोठ्या मशीनच्या सहायाने शोध मोहीम राबविण्यात आली. पंरतु जिल्हा खनिकर्ज विभागाला याचा थांगपत्ताही नाही. जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांच्याशी संपर्क साधला असता. त्यांनी याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. विशेष म्हणजे तालुक्यात एखादी शोध मोहीम राबविली जाते. तेव्हा महसुल प्रशासन व संबंधित विभागाला त्याची माहिती असते. भारतीय भूवैज्ञानिकांचे पथक तुमसर तालुक्यात आठवडाभर असतांना खनिकर्म विभागाने साधी चौकशीही केली नाही. महसुल प्रशासनानेही याकडे दुर्लक्ष केले. आम्हाला कोणतीच माहिती नाही. असे सांगून खनिकर्म विभाग आणि खनिकर्म विभाग हातवर करीत आहेत.

टॅग्स :Governmentसरकार