पालकांच्या स्वाधीन केले : दोन्ही बालके मध्यप्रदेशातीलराहुल भुतांगे तुमसरघरात अठरा विश्व दारिद्रय त्यात नेहमी घरच्या वरिष्ठांकडून सतत हेळसांड होत असल्यामुळे कंटाळून कुणालाही न सांगता बेपत्ता झालेली दोन बालके अखेर तुमसर रोड (देव्हाडी) रेल्वे स्थानकावरील रेल्वे पोलिसांच्या सर्तकतेमुळे सापडली. बालकांच्या पालकाशी संपर्क करुन त्यांच्या पाल्यांना त्यांच्या स्वाधीन करुन प्रामाणिकतेचा परिचय रेल्वे पोलिसांनी करुन दिला. योगेश भरतलाल पटले (१३) रा. गचपुर ता. खैरलांजी जि. बालाघाट, संतोष अशोक दहिलींगे (१४)रा. डहरवाल रा. सिरपुर जि. बालाघाट अशी या बालकांची नावे आहेत.२ मार्च २०१७ ला संतोष दहिलिंगे हा मुलगा कुणालाही न सांगता त्याच्या स्वगावावरुन सकाळच्या दरम्यान निघून गेला होता.त्याच दिवशी तो महाराष्ट्र एक्सप्रेस गाडी क्र. ११०३९ डाऊन ने तुमसर रोड रेल्वे स्थानकावर सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान आला व या डब्यातून त्या डब्यात संशयास्पद चढ उतर करत असतांना गस्तीवर असलेले रेल्वेचे जवान अमर ढबाले यांच्या निदर्शनास येताच त्याला पकडून रेल्वे पोलिस चौकीत आणले व त्यांची विचारपुस करताच तो घरुन पडालेला असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन अमर ढबाले यांनी वेळीच सतर्कता दाखवून त्या मुलांच्या पालकाशी संपर्क साधून त्यांना मुलगा सापडल्याची माहिती दिली तर दुसरा मुलगा योगेश पटले हा १५ मार्च २०१७ पासून गचपुर येथून बेपत्ता झाला होता. तो १७ मार्च रोजी तुमसर रोड रेल्वे स्थानकावर संधिग्ध व घाबरलेल्या स्थितीत एका आडोश्याला बसलेला दिसताच गस्तीवर असलेले रमेश यादव अमर ढबाले यांनी त्याला खावू घालून विचारपुस केले असता घरच्याच्या त्रासाला वैतागूण घरुन निघून गेल्याचे सांगितले. यावरुन रेल्वेच्या जवानांनी त्याच्या पालकाशी दुरध्वनीवर संपर्क साधला व त्या मुलास घेवून जाण्यास सांगितले. त्यानुसार आज १८ मार्चला योगेशला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करताच पालकांच्या डोळ्यात अशृ तरळले. आजच्या युगातही असे कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक पोलीस ही आहेत याचे समाधान व्यक्त करुन दोन्ही बालकांच्या पालकाने रेल्वे पोलीस अमर ढबाले व रमेश यादव यांना धन्यवाद दिले.
रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेने बेपत्ता बालकांचा शोध
By admin | Published: March 20, 2017 12:16 AM