प्रकरण जेएसव्ही डेव्हलपर्सचे : अमित चौधरी यांची पोलीस ठाण्यात तक्रारभंडारा : जेएसव्ही डेव्हलपर्स ही कंपनी २००९ मध्ये स्थापन करण्यात आली. सन २०१२ मध्ये सेबी भोपाल यांनी चौकशी करून सदर कंपनी बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. परंतु कंपनीने सेबीच्या आदेशाची माहिती न देता आमच्याकडून गुंतवणूक घेणे सुरूच ठेवले. दामदुप्पट करून देण्याच्या नावाखाली प्रलोभन देवून माझ्यासह अनेक गुंतवणुकदारांकडून कोट्यवधी रूपये गोळा केले आहे. आमचेही तिथे पैसे गुंतलेले असून पोलीसात खोटी तक्रार दिल्याचे अमित चौधरी यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात चौधरी यांनी भंडारा पोलीस ठाण्यात अन्य गुंतवणुकदारांविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. सदर कंपनीत आमचेही पैसे असल्याने खोटी तक्रार देवून ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरू असल्याचेही चौधरी यांनी तक्रारीतून म्हटले आहे. या तक्रारीत प्रशांत रामटेके, शिवचरण बडवाईक, ज्ञानेश्वर निकुळे, सुरज कुथे, विष्णू लोणारे, तेजाराम हटवार, केशवराव बिसने, किनैय्या नागपुरे, श्यामलाल काळे, वंदना ठाकरे, रमेश बोंदरे, नामदेव तिजारे, मधुकर येरपुडे, विक्रांत तिडके, चंद्रभान कोडवते, गिरीधर गभने, भगवान खंडाईत गोपाल बसेशंकर, यशवंत खंडाईत, अरविंद शेंडे, ज्ञानेश्वर गजभिये, वनिता चवरे, कल्पना जावळकर, विद्या भांबोरे यांची नावे आहे. सेबीने तत्कालीन संचालक विजयालक्ष्मी कठैत, भुपेंद्र कठैत आणि दिनेश टेंभरे यांच्यावर गुन्हा दाखल करून १० वर्ष कैद व २५ कोटी रूपये प्रत्येकी वसुल करण्याचा आदेश सन २०१५ मध्ये दिला आहे. सदर आदेशाबद्दलची माहिती कंपनीने आम्हाला दिलेली नाही. तिन्ही संचालकांनी सदर कंपनी १ जुलै २०१४ ला पार्थ सारथी डे यांना संपूर्ण अधिकारासह तसेच मालमत्तेसह हस्तांतरीत केली. पार्थ डे हे ८० टक्के भागदारक आहे. गुंतवणुक दारांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेची परतफेड करण्याची मुदत आल्याने गुंतवणुकदारांची रक्कम परत करण्याकरीता संचालकांनी भंडारा येथे कंपनीच्या मालकीची जमिनी विकण्याचा निर्णय घेतला. विक्रीतून आलेली रक्कम गुंतवणुकदारांना परत करण्याचा अधिकारी संध्या आंबेडारे यांना देण्यात आल्यानंतर आंबेडारे यांनी सदर मालमत्ता रवि परतवार यांना विक्री करून दिली. त्या मालमत्तेचे ९० लक्ष ७० हजार ४०० रूपये मिळाले असून ते सर्व रक्कम गुंतवणुकदारांना परत करण्यात आले आहे. उपरोक्त नमूद केलेल्या व्यक्तींकडून कोणतीही रक्कम स्विकारली नसल्याचेही अमित चौधरी यांचे म्हणणे आहे. तक्रारीच्या प्रतिलिपी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
सेबीच्या आदेशाची माहितीच दिली नाही
By admin | Published: September 30, 2016 12:45 AM