लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत भंडारा जिल्हा नागपूर विभागातून दुसरा आला आहे. जिल्ह्याचा निकाल ९३.५८ टक्के लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. परसोडी येथील ओम सत्यसाई कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तोषिता शोभाराम गभणे ही ९५.०७ टक्के गुण घेऊन विज्ञान शाखेत जिल्ह्यातून अव्वल आली आहे.भंडारा जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला १७ हजार ४०३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६ हजार २८६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.६३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून ७८२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७७१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष प्राविण्यश्रेणी ७१८, प्रथम श्रेणी ३०११ आणि द्वितीय श्रेणी ३८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कला शाखेतून ८१३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७२०६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. उत्तीर्णतेची टक्केवारी ८८.६२ आहे. कला शाखेत प्राविण्य श्रेणीत १३७, प्रथम श्रेणीत १७४८ आणि द्वितीय श्रेणीत ४९६० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत ९६० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ९२४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.२५ आहे. वाणिज्य शाखेतून प्राविण्य श्रेणीत १०१, प्रथम श्रेणीत ४१७ आणि द्वितीय श्रेणीत ३८४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. व्यवसायीक अभ्यासक्रम परीक्षेला ४९२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ४४३ म्हणजे ९०.४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. प्राविण्य श्रेणीत ९, प्रथम श्रेणीत १९९ आणि द्वितीय श्रेणीत २३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. भंडारा जिल्हा नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात द्वितीय स्थानी आहे.बारावीच्या परीक्षेत भंडारा लगतच्या परसोडी येथील ओम सत्यसाई कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी तोषिता शोभाराम गभणे ९५.०७ टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल आली आहे. तिला ६५० पैकी ६१८ गुण मिळाले आहेत. जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त शिक्षक असलेल्या शोभाराम गभणे यांची ही कन्या होय. विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेतही तोषिता जिल्ह्यात प्रथम आली होती. तोषिता जिल्ह्यात अव्वल आल्याचे माहित होताच संस्थाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, नागपूर शिक्षण मंडळाचे माजी विभागीय सहाय्यक सचिव संजय आयलवार, उपाध्यक्ष वसंतराव कारेमोरे आदींनी तिचा सत्कार केला. ओम सत्यसाई कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी गौरव सुरेंद्र चव्हाण ९३.६९ टक्के, ऋचिता प्रशांत खवास ९२.९२ टक्के, प्रथमेश अशोक नेवसे ९०.१५ टक्के, तनय गणेश साळी ९०.४६ टक्के, शुभम शिवदास डोडे ९०.७६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.मुलींनी मारली बाजी, ९५.१८ टक्के उत्तीर्णबारावीच्या परीक्षेतही भंडारा जिल्ह्यात मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९५.१८ असून मुले ९२.०३ टक्के उत्तीर्ण झाले आहेत. ८५५३ मुली बारावीच्या परीक्षेला बसल्या होत्या. त्यापैकी ८१४१ मुली उत्तीर्ण झाल्या तर ८८५० मुले परीक्षेला बसले होते त्यापैकी ८१४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात मुलीच आघाडीवर आहेत.लाखनी तालुका जिल्ह्यात अव्वलबारावीच्या परीक्षेत लाखनी तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक लागला आहे. या तालुक्यातील ९५.८० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसऱ्या स्थानी भंडारा तालुका असून या तालुक्याचा निकाल ९५.७६ आहे. साकोली तालुका ९४.५३, पवनी तालुका ९४.१५, मोहाडी ९३.८३, लाखांदूर ९१.१८ आणि तुमसर तालुक्याचा निकाल ८८.८५ टक्के लागला आहे.वाणिज्य शाखेत पूजा मेहता अव्वलभंडारा शहरातील नूतन कन्या शाळेतील विद्यार्थिनी पूजा अश्विन मेहता ही वाणिज्य शाखेतून जिल्ह्यात अव्वल आली आहे. तिला ९६.६२ टक्के गुण आहेत. तसेच कला शाखेतून जिल्ह्यातून नेहा शिवकुमार डोकरीमारे हिने ९३.५३ टक्के गुण प्राप्त करीत प्रथम आली आहे.
बारावीच्या परीक्षेत भंडारा विभागात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 5:00 AM
भंडारा जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेला १७ हजार ४०३ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १६ हजार २८६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९८.६३ टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून ७८२० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७७१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात विशेष प्राविण्यश्रेणी ७१८, प्रथम श्रेणी ३०११ आणि द्वितीय श्रेणी ३८९४ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. कला शाखेतून ८१३१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ७२०६ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.
ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९३.५८ टक्के : तोषिता गभणे जिल्ह्यात अव्वल