शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

'त्या' अपघातातील दुसऱ्या विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2016 12:13 AM

शुक्रवारी ट्रक-दूचाकी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.

शहरातील रस्ता धोकादायक : दुभाजक असता तर टळला असता अनर्थतुमसर : शुक्रवारी ट्रक-दूचाकी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर दुसऱ्यावर नागपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. पायाची नस कापली गेल्याने त्याची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. यादरम्यान जलद वाहन चालविण्याप्रकरणी तुमसर पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध चालान करून कारवाईचा सोपस्कार केला. दुसरीकडे भर शहरातून बेदरकारपणे वाहनामुळे तुमसरकरांचा जीव धोक्यात आला आहे. उलट दुचाकीस्वारांवर येथे तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला, हे विशेष. शहरातून तुमसर-कटंगी तथा वाराशिवनी हा आंतरराज्यीय महामार्ग जातो. शुक्रवारी शिकवणी वर्गावरून मित्राच्या घरी दुचाकीने जाणाऱ्या दोन शाळकरी मुलांचा अपघात झाला. तुमसर-भंडारा मार्गावरील विनोबा-श्रीराम नगरातील मुख्य रस्त्यावर हा अपघात घडला. यात आर्यन विकास परिहार (१५) व संघरत्न राजेश बोंबार्डे (१५) दोघेही रा. तुमसर हे गंभीररीत्या जखमी झाले. आर्यन दुचाकीच्या मागे बसला होता तर संघरत्न हा दूचाकी चालवित होता. संघरत्न याने मित्राच्या घराकडे जाण्याकरिता दूचाकी घातली. रस्ता ओलांडताना समोरून जलद गतीने येणाऱ्या ट्रकने चिरडले. या अपघातात दूचाकीचा चेंदामेंदा झाला. आर्यनचा मृत्यू झाला तर संघरत्नची प्रकृती चिंताजनक आहे.शहरातून जड वाहतुकीकरिता ताशी २० ते २५ कि.मी. वेगाचे बंधन आहे. परंतु या मार्गावर जलद वाहने सर्रास धावतात. दूचाकीला धडक दिली त्या ट्रकची गती ताशी ७० ते ८० कि़मी. इतकी होती, असे सांगण्यात येते.हा अपघात एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रस्ता ओलांडताना संघरत्न याने दुचाकीची गती कमी होती. उलट ट्रकची गती अतिशय जास्त होती. ट्रकची गती नियमानुसार २० ते २५ कि़मी. इतकी असती तर अपघात घडलाच नसता. ट्रकची गती जास्त असल्याने तो नियंत्रित झाला नाही.या मार्गावर ताशी किती गती ठेवावी याचा फलक दिसत नाही. शहरातून हा मार्ग जात असल्याने येथे चारचाकी वाहनांची गती नियंत्रित करण्याची गरज आहे. भरधाव वाहने या मार्गावरून धावतात. सकाळी व सायंकाळी या मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी असते वाहतूक पोलीस वेळेपुरते येथे कर्तव्य बजावतात. जड वाहने, तथा बेदरकारपणे वाहने चालविण्यावर अजुनपर्यंत ठोस कारवाई झाली नाही हे विशेष. दुभाजक नाहीखाप्यापासून तुमसर शहरातील रेल्वे फाटकापर्यंत दूभाजक तयार करण्यात आले, परंतु जिथे अपघात घडला, त्या १५० मीटर रस्त्यावर दूभाजक नाही. दूभाजक येथे असता तर अपघात घडला नसतो. (तालुका प्रतिनिधी)शहरातून जलद ट्रक चालविण्याप्रकरणी संबंधित ट्रक चालकाविरूद्ध चालान करून कारवाई करण्याची नोटीस देवून नियमानुसार कारवाई करण्यात येईल. राजेंद्र शेटे, पोलीस निरीक्षक तुमसर.शहरातील खापाटोली परिसरातील रस्त्यावर एका ठिकाणी दूभाजक नाही. निधीअभावी हे काम राहिले असावे. मंगळवारी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून दुभाजकाविषयी निर्णय घेतला जाईल. नगरपरिषदेकडून पत्र प्राप्त झाले तरी कारवाई करण्यात येईल.-विजया सावरकर, उपविभागीय अभियंता, सार्व. बांधकाम विभाग, मोहाडी.